शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

मविआचे जागावाटप फॉर्म्युल्यावर एकमत? वंचित २, राजू शेट्टींना १; दोन दिवसांत अधिकृत घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 06:19 IST

MVA Seat Sharing: आघाडीत शिवसेना ठाकरे गट मोठा भाऊ असणार हे निश्चित झाले असून, सर्वाधिक जागा ठाकरे गटाच्या वाट्याला येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर निश्चित झाल्याची खात्रीलायक माहिती आहे. यासंदर्भात गुरुवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आघाडीतील जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे. अधिकृत घोषणा येत्या दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीचे जागावाटपाचे सूत्र २०-१८-१० असे ठरले आहे. यात प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसाठी २ जागा सोडणार असल्याचे समजते. दिवसभर चाललेल्या  या बैठकीला शरद पवार यांच्यासह ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात उपस्थित होते. 

ठाकरे गट मुंबईत चार जागा लढणार?सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गट मुंबईत ४ जागा लढण्याच्या तयारीत आहे. शरद पवार गट उत्तर मुंबईसाठी उत्सुक नाही. त्यामुळे उत्तर मुंबईची जागा कुणी लढणार नसेल तर ठाकरे गट लढणार आहे. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई या जागांवर ठाकरे निवडणूक लढण्याची शक्यता आहे. ईशान्य मुंबई ही जागा ठाकरे गटाकडे आहे. पण काँग्रेस या जागेसाठी आग्रही आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी बरोबर आल्यास ईशान्य मुंबई ही जागा वंचितला सोडली जाण्याची शक्यता आहे.

मित्रपक्षांना तीन जागा nमविआच्या मित्रपक्षांना हे तीन पक्ष आपल्या वाट्याच्या तीन जागा सोडणार आहेत. यात ठाकरे गटाच्या २० जागांपैकी दोन जागा प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीला सोडण्यात येतील. nतर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या १० जागांपैकी एक जागा राजू शेट्टी यांच्यासाठी सोडली जाणार असल्याचे समजते. वंचित बहुजन आघाडीच्या जागांबाबत येत्या एक-दोन दिवसांत आंबेडकर यांच्याशी चर्चा होणार आहे.

आम्हीही मविआसोबत : आनंदराज आंबेडकरnआम्हीही महाविकास आघाडीसोबत असून, अमरावतीची  एक जागा आम्हाला लढवायची आहे, असे रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर म्हणाले. nकाल मी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटलो. तुमची आम्हाला गरज आहे. आता तब्येतीची काळजी घ्या, असा सल्ला त्यांना मी दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.

आघाडीत शिवसेना ठाकरे गट मोठा भाऊ असणार हे निश्चित झाले असून, सर्वाधिक जागा ठाकरे गटाच्या वाट्याला येणार आहेत. त्याखालोखाल काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटाला जागा मिळतील.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabhaलोकसभाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी