पुन्हा काँग्रेसचीच सत्ता

By Admin | Updated: October 9, 2014 01:02 IST2014-10-09T01:02:06+5:302014-10-09T01:02:06+5:30

महाराष्ट्र हा काँग्रेसचा गड राहिला आहे. महाराष्ट्रात येऊन नरेंद्र मोदी यांनी कितीही सभा घेतल्या तरी त्याचा परिणाम होणार नाही. कारण मोदी सरकारचा १०० दिवसाच्या कार्यकाळ महाराष्ट्राच्या

Congress's power again | पुन्हा काँग्रेसचीच सत्ता

पुन्हा काँग्रेसचीच सत्ता

अशोक गहलोत यांचा दावा : बजेरियात सभा
नागपूर : महाराष्ट्र हा काँग्रेसचा गड राहिला आहे. महाराष्ट्रात येऊन नरेंद्र मोदी यांनी कितीही सभा घेतल्या तरी त्याचा परिणाम होणार नाही. कारण मोदी सरकारचा १०० दिवसाच्या कार्यकाळ महाराष्ट्राच्या जनतेने बघितला आहे. मोदी फक्त कामाचे मार्केटिंग करीत आहेत हे जनतेच्या लक्षात आले आहे. महाराष्ट्राच्या जनतेने नेहमीच काँग्रेसला साथ दिली आहे. यंदाही काँग्रेसलाच साथ देणार, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केला.
मध्य नागपूर मतदार संघाचे काँग्रेसचे उमेदवार अनिस अहमद यांच्या प्रचारार्थ बजेरिया येथे त्यांची सभा पार पडली. या सभेत त्यांनी मोदी सरकारचा चांगलाच समाचार घेतला तर काँग्रेसच्या ६५ वर्षाचा कामांचा आढावा जनतेपुढे मांडला.
यावेळी काँग्रेस कमिटीचे सचिव बाला बच्चन, माजी खासदार विलास मुत्तेमवार, पीरिपाचे नेते जोगेंद्र कवाडे, मुन्ना ओझा, नगरसेवक दीपक पटेल, हर्षला साबळे, लक्ष्मीकांत दीक्षित, विशाल मुत्तेमवार, महासचिव अतुल कोटेचा, ताराचंद शर्मा, विश्वजित भगत उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना अनिस अहमद यांनी मध्य नागपुरात केलेल्या विकास कामांची जनतेला माहिती दिली. यावेळी आशिष दीक्षित, महेश श्रीवास, प्रज्ञा बडवाईक, डॉ. वामन कोंबाडे, दिनेश पारेक, सुनील , के. डी. गौर, संजय सागर, ममता वाजपेयी, कांता पराते, यशश्री नंदनवार, पुष्पा निमजे, जुल्फेकार भुट्टो, रितेश सोनी, गोपाल पट्टम, आतिक कुरेशी, लोकेश बडरीया अमित भय्या, सत्यपाल केवलरामानी, राजू महाजन, राजन नंदनकर, विवेक निकोसे, शांतीलाल गांधी, राजू चांदपूरकर, दिलशाद खान, इफ्तेकार अहमद आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Congress's power again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.