काँग्रेस करणार राज्यव्यापी रास्तारोको
By Admin | Updated: February 9, 2015 05:54 IST2015-02-09T05:54:12+5:302015-02-09T05:54:12+5:30
जनतेच्या प्रश्नांबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप करीत प्रदेश काँग्रेसने राज्यव्यापी रास्तारोको आंदोलनाची घोषणा केली आहे.

काँग्रेस करणार राज्यव्यापी रास्तारोको
मुंबई : जनतेच्या प्रश्नांबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप करीत प्रदेश काँग्रेसने राज्यव्यापी रास्तारोको आंदोलनाची घोषणा केली आहे. जनतेच्या मागण्यांकडे सातत्याने लक्ष वेधण्याचा प्रयत्न करूनही सरकार ढिम्म असल्यानेच सोमवारी राज्यभर रास्तारोको करण्यात येणार असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.
केंद्रीय पथकाने दुष्काळ पाहणीचे सोपस्कार पार पाडले; मात्र अद्याप केंद्राकडून राज्याला मदत मिळाली नाही. संधी असताना सरकार जनतेला स्वस्ताईचा लाभ देण्यास तयार नसल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. (प्रतिनिधी)