शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसणार, 'बडा नेता' भाजपमध्ये दिसणार? मुनगंटीवार यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2024 11:28 IST

"येणार आहे का काय? तुम्ही रोज बघता, तरी विचारताय येणार आहे का कुणी? एवढी काय वाट बघताय तुम्ही? खूप जण येणार आहेत."

देशात लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. यातच, सध्या काँग्रेसह विरोधी पक्षातील बरेच नेते भाजप अथवा त्यांच्या मित्रपक्षांच्या वाटेवर जाताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी, राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्या आणि मराठवाड्यात काँग्रेसला खिंडार पडलं. याशिवाय, काँग्रेस नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नूषा डॉ. अर्चना पाटील चाकूरकर शनिवारी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तत्पूर्वी, अधिकृत पक्ष प्रवेशापूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. यानंतर आता, "मी नाव घेत नाही, पण उद्या काँग्रेसचा अतिशय मोठा नेता आमच्या पक्षात आला, तर त्याच्या अनुभवाचा फायदाच होईल ना? असे सूचक विधान करत खूप जण येणार आहेत, असा दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. 

काय म्हणाले मुनगंटीवार? -मुनगंटीवार म्हणाले, "दो से भले चार, यात वाईट काय? दुसऱ्या पक्षातील लोक आपल्या पक्षात आले तर शेवटी आपणच मोठे होतो. त्यामुळे मला वाटते की, हा प्रश्नच राहत नाही की, तुम्हाला काय गरज राहते? मी नाव घेत नाही, पण उद्या काँग्रेसचा अतिशय मोठा नेता आमच्या पक्षात आला, तर त्याच्या अनुभवाचा फायदाच होईल ना?  शेवटी प्रत्येकामध्ये काही गुण तर नक्कीच आहेत." यावर, येणार आहे का कुणी? असा प्रश्न विचारला असता, खूप जण येणार आहेत. येणार आहे का काय? तुम्ही रोज बघता, तरी विचारताय येणार आहे का कुणी? एवढी काय वाट बघताय तुम्ही? खूप जण येणार आहेत. फक्त आता अशोक चव्हाण आले आहेत, बाकी वेटिंगमध्ये येतील ते, काही अडचण नाही," असा दावा मुनगंटीवार यांनी केला आहे. ते टीव्ही 9 मराठी सोबत बोलत होते.

गिरीश महाजनांनीही केला होता दावा - "संजय निरुपम असतील, अनेक नेते आहेत, जे भाजपमध्ये असतील, आमच्या मित्र पक्षांत असतील, यायला उत्सुक आहेत. आगामी आठ-दहा दिवसांत आपल्याला हे चित्र बघायला मिळेल. अनेक मोठे नेते आमच्याकडे प्रवेश करतील. खरं म्हणजे आता या पक्षात रहायला कुणीही तयार नाही. यांचं राज्यावरचं नेतृत्व, यांचं देशावरचं नेतृत्व यावर आता कुणाचाही विश्वास राहिलेला नाही. म्हणूनच आता सर्वांनाच वाटतंय की, आपण मुख्य प्रवाहात यावं. मोदीजींच्यासोबत काम करावं. म्हणून अनेक दिग्गज नेते यापुढेही लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत आमच्या पक्षामध्ये, आमच्या मित्र पक्षांमध्ये सहभागी होतील," असे गिरीश म्हजन यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारBJPभाजपाGirish Mahajanगिरीश महाजनcongressकाँग्रेस