शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

“गरिबांचे पैसे गेले कुठे? घरकुल योजनेतील घरे अजून मिळालेली नाहीत”; काँग्रेसची सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 16:09 IST

Congress Vijay Wadettiwar Vidhan Sabha News: घरकुल योजनेबाबत विधानसभा अध्यक्षांनी गंभीर दखल घेतली.

Congress Vijay Wadettiwar Vidhan Sabha News: राज्यातील घरकुल योजनेतील घरं मंजूर होऊनही गेल्या तीन वर्षांपासून गरिबांना मिळाली नाही. या योजनेसाठी हक्काचा निधी मिळालेला नाही. या गंभीर मुद्द्यावरून आज विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला धारेवर धरले. तीन पावसाळे झाले, लोकं कुठे राहत असतील याचा विचार करा. सरकार म्हणून जनाची नाही तर किमान मनाची तरी ठेवा, अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला.

राज्यात अनेक लाभार्थ्यांना घरकुल योजनेअंतर्गत घरे मंजूर झाली आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून या घरांसाठीचा निधी रखडलेला आहे. अनेक लाभार्थ्यांनी घरांची बांधकामे सुरू केली आहेत, परंतु पैसे न मिळाल्याने ही कामे अर्धवट अवस्थेत आहेत.लोक आपली घरे सोडून कुठे राहत असतील याचा विचार सरकार करते का? सरकारकडून सतत लवकरात लवकर निधी देऊ ही उत्तर आहेत. हा 'लवकर' नक्की कधी येणार? असा सवाल वडेट्टीवार यांनी विधानसभेत विचारला.

तीन वर्षांपासून निधी रखडल्याने लाभार्थ्यांनी तीन पावसाळे त्यांनी कसे काढले असतील, याची सरकारला जाणीव आहे का? हे अधिवेशन संपेपर्यंत तरी गरिबांच्या खात्यात निधी जमा होणार का? असे प्रश्न वडेट्टीवार यांनी घरकुल योजनेबाबत उपस्थित केले.

दरम्यान, घरकुल योजनेबाबत विधानसभा अध्यक्षांनी गंभीर दखल घेतली. केंद्र शासनाकडून या उपक्रमासाठी किती निधी येणे अपेक्षित आहे आणि तो कधी उपलब्ध होणार, याचा सविस्तर पाठपुरावा करून हे अधिवेशन संपण्यापूर्वी शासनाने संपूर्ण माहिती सभागृहासमोर सादर करावी, असे निर्देश अध्यक्षांनी दिले आहेत.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Poor Await Housing Funds: Congress Criticizes Government Delay

Web Summary : Congress slams the government for delaying housing funds for three years. Beneficiaries are struggling with incomplete houses. Wadettiwar questions the government's apathy in the assembly, demanding immediate fund allocation. The speaker has ordered a report before the session ends.
टॅग्स :vidhan sabhaविधानसभाcongressकाँग्रेसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारVidhan Bhavanविधान भवन