शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
2
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
3
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
4
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
5
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
6
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
7
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
8
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
9
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
10
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
11
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
12
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
13
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
14
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
15
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
16
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
17
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
18
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
19
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
20
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप

“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 15:14 IST

Congress Vijay Wadettiwar News: दिवाळीआधी शेतकऱ्यांना मदत झालीच पाहिजे, तर त्यांच्या आयुष्यात दिवाळी होईल, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

Congress Vijay Wadettiwar News: राज्यात अनेक ठिकाणी गेल्या महिनाभरात अतिवृष्टीने हाहाकार माजवला असून, शेतकऱ्यांच्या स्वप्नांची अक्षरशः माती झाली. बीड, जालना, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, यवतमाळ या जिल्ह्यांना एकट्या सप्टेंबर महिन्यात मोठा तडाखा बसला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे क्षेत्र वाढत आहे. सप्टेंबर महिन्यात तब्बल २६ लाख हेक्टरचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले. यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. 

बळीराजाच्या घरात दिवाळीला असणार अंधार. शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील पाणी, उद्वस्त झालेली घर आणि थंड पडलेले सरकार यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे दिवाळे निघाले आहे. सप्टेंबर या एका महिन्यात राज्यातील शेतकऱ्यांची २६ लाख हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत, ५२ लाख हेक्टरवरील खरीप पिके पाण्यात गेली आहेत. मोडलेल्या बळीराजाला उभे करण्याऐवजी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये सरकार व्यस्त आहे,बैठका सुरू आहेत! तोंडावर दिवाळी आली आहे, पण शेतकऱ्याना आता कोण विचारत आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे!

दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत करणार अस सांगत होते.. अजूनही मदत मिळालेली नाही कसली दिवाळी? कुठून आणावे गोडधोड पदार्थ, मुलांसाठी कपडे? हे सरकार म्हणजे बडा घर पोकळ वासा आहे.. किमान हेक्टरी ५०,००० मदत केली  पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे! दिवाळीआधी शेतकऱ्यांना मदत ही झालीच पाहिजे तर त्यांच्या आयुष्यात दिवाळी होईल, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे राज्यात तब्बल ४१,०६७ नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले. १४७ निवारा केंद्रे स्थलांतरितांसाठी राज्यभरात उभारण्यात आली आहेत. ७५ निवारा केंद्रे एकट्या सोलापूर जिल्ह्यात आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Tears, Ruined Homes, Cold Government: Farmers Bankrupt, Says Vijay Wadettiwar

Web Summary : Vijay Wadettiwar criticizes the state government for its apathy towards farmers affected by heavy rains, leading to crop destruction and financial ruin. He demands immediate financial aid and loan waivers before Diwali.
टॅग्स :congressकाँग्रेसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारRainपाऊसfloodपूरFarmerशेतकरी