शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे-अजितदादांना वारंवार दिल्लीला का जावे लागते? दिल्लीच्या आदेशाशिवाय...; काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 13:05 IST

Maharashtra Politics: गटनेता निवडीचा आमचा प्रस्ताव दिल्लीकडे गेला आहे. दिल्लीत हायकमांड निर्णय घेणार असून त्या संदर्भात आमचे बोलणे झालेले आहे, अशी माहिती काँग्रेस नेत्यांनी दिली.

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून नवनिर्वाचित आमदारांना शपथबद्ध करण्यात आले. यानंतर विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. परंतु, अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीचा निर्णय झालेला दिसत नाही. खातेवाटप निश्चित करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावरून काँग्रेसने टीकास्त्र सोडले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतील. या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत खातेवाटपाचा फॉर्म्युला अंतिम केला जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगरविकाससह गृहखात्यासाठी आग्रही असल्याने या मागणीवर काय तोडगा निघतो, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. शिंदे यांना गृहखात्याच्या बदल्यात महसूल खाते दिले जाऊ शकते, अशी चर्चा रंगत आहे. यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला आहे. 

शिंदे-अजितदादांना वारंवार दिल्लीला का जावे लागते? 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना वारंवार दिल्लीला का जावे लागते? दोघांनाही दिल्लीवरच विसंबून राहावे लागेल, त्यांच्या आदेशाशिवाय यांचा पत्ता हलणार नाही, वारंवार दयेचा अर्ज करून त्यांना तो मिळवावे लागेल, या शब्दांत वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला. तसेच ईव्हीएमचा घोळ आहे की नाही, हे सिद्ध करण्यासाठी भारतात एकमेव आपला देश आहे ज्यात ईव्हीएम वर निवडणूक होतात.  सगळे देश ईव्हीएम वर निवडणूक घेत नाहीत. जगाने ज्या गोष्टी नाकारल्या त्या आपण का करतोय, पुढच्या निवडणूक बॅलेटवर निवाडणूक झाल्या पाहिजे, बॅलेटपेपर हा अंतिम निर्णय आहे. त्यासाठी कोर्टात आम्ही दाद मागण्याची तयारी करत आहोत, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. 

दरम्यान, गटनेता निवडीचा आमचा प्रस्ताव दिल्लीकडे गेला आहे. दिल्लीत हायकमांड निर्णय घेणार असून त्या संदर्भात आमचे बोलणे झालेले आहे. या अधिवेशनात आमची एकत्र बैठक घेऊ आणि चर्चा करू, विरोधी पक्षनेतेपदाबाबत भाजपा तयार आहे का? त्यांची तयारी आहे का? हे त्यांना विचारू आणि मग पक्षनेतेपदासाठी आम्ही नाव देऊ, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Cabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारMahayutiमहायुतीcongressकाँग्रेसVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार