शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
2
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
3
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
4
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
5
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
6
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
7
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
9
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
10
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
11
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
12
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
13
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
14
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
15
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
16
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
17
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
18
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
19
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
20
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!

नागपुरातील राजभवनाला काँग्रेसचा ट्रॅक्टरने घेराव; केंद्रीय कृषी कायदे, इंधन दरवाढीला विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2021 01:42 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भांडवलदारांचे गुलाम झाले असून, ते आता या देशातील मजूर, शेतकऱ्यांसह सर्व नागरिकांनाच भांडवलदारांचे गुलाम करायला निघाले आहेत, अशी जाहीर टीका महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली. 

नागपूर : केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्यांविरोधात दिल्लीत आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आणि केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी शनिवारी काँग्रेसतर्फे नागपुरातील राजभवनाला ट्रॅक्टरसह घेराव घालण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भांडवलदारांचे गुलाम झाले असून, ते आता या देशातील मजूर, शेतकऱ्यांसह सर्व नागरिकांनाच भांडवलदारांचे गुलाम करायला निघाले आहेत, अशी जाहीर टीका महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली. या आंदोलनात हजारो कार्यकर्ते ट्रॅक्टरसह सहभागी झाले होते. राजभवनासमोर ‘किसान अधिकार दिन’ म्हणून सभा आयोजित करण्यात आली. सभेला संबोधित करताना थोरात पुढे म्हणाले, केंद्राचे कृषी कायदे हे नफेखोर व साठेबाजांसाठी तयार करण्यात आले आहेत. ५२ दिवसांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीत आंदोलन करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी आपले बलिदान दिले. परंतु, केंद्र सरकारला त्यांची साधी कीवही येत नाही. केंद्राचे कायदे आपण मोडून काढू. हे आंदोलन इतिहास घडवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत, क्रीडामंत्री सुनील केदार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, मुंबई प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, खा. बाळू धानोरकर, माणिकराव ठाकरे, आशिष दुआ यांनीही मनोगत व्यक्त करीत केंद्र सरकारला धारेवर धरले.  आंदोलनात प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा संध्या सव्वालाखे, चंद्रकांत हांडोरे, आ. विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी, आ. राजू पारवे,  मुज्जफ्फर हुसेन, राजेंद्र मुळक, अनिस अहमद, सतीश चतुर्वेदी, अतुल लोंढे, विशाल मुत्तेमवार, सत्यशील तांबे, प्रतिभा धानोरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. 

राजभवनात घुसण्याचा प्रयत्न निष्फळबाळासाहेब थोरात यांचे भाषण सुरू असताना आ. विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी आणि माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी कार्यकर्त्यांसह राजभवनच्या मुख्य गेटमधून आत घुसण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्याने त्यांचा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. राजभवनाच्या चारही बाजूंचे रस्ते बंद करण्यात आले होते. यावेळी पोलिसांचा खडा पहारा होता. 

टॅग्स :congressकाँग्रेसBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातnagpurनागपूरFarmer strikeशेतकरी संप