"केंद्राच्या पॅकेजवरून काँग्रेस जनतेमध्ये संभ्रम पसरवत आहे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2020 04:32 IST2020-08-15T04:32:39+5:302020-08-15T04:32:51+5:30

काँंग्रेसचा खोटेपणा उघडा पाडू : आ. मंगलप्रभात लोढा

"Congress is spreading confusion among the people over the Centre's package." | "केंद्राच्या पॅकेजवरून काँग्रेस जनतेमध्ये संभ्रम पसरवत आहे"

"केंद्राच्या पॅकेजवरून काँग्रेस जनतेमध्ये संभ्रम पसरवत आहे"

मुंबई : आत्मनिर्भर भारत योजनेसह केंद्र सरकारच्या सर्वच योजनांबाबत खोटे बोलून काँग्रेस जनतेत संभ्रम पसरवत आहे. कॉग्रेसचा हा खोटेपणा जनतेसमोर सर्व पातळीवर उघडा पाडणार असल्याचे सांगतानाच त्यांची निदर्शने फ्लॉप ठरल्याचा दावा मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी केला आहे.

काँग्रेसच्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी भाजप प्रदेश कार्यालयात मोठ्या प्रमाणावर नेते, पदाधिकारी जमले होते. खासदार गोपाळ शेट्टी, मनोज कोटक, आमदार प्रसाद लाड, पराग अळवणी, राम कदम, मिहिर कोटेचा, योगेश सागर यांच्यासह मुंबईतील भाजप नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
घोषणा करूनही काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलनासाठी पोहचले नसल्याचे सांगून लोढा म्हणाले की, वेळ पडल्यास काँग्रेसला जशास तसे उत्तर दिले जाईल. काँग्रेसने खोटेपणा सोडून सत्याची कास धरावी असे आवाहनही त्यांनी केल.

काँग्रेसचे कार्यकर्ते केंद्राच्या योजनेबाबत सोशल मिडियावर स्वत:च्याच कार्यकर्त्यांना प्रश्न विचारत आहेत आणि त्यांचेच कार्यकर्ते त्या प्रश्नांना उत्तरे देत आहेत. हा खोटेपणा भाजपाकडून उघडा पाडला जाईल, असे प्रसाद लाड म्हणाले. केंद्राने योजना जाहीर केल्या मात्र राज्य सरकारने अद्याप पॅकेज जाहिर केलेले नाही. त्यामुळे खरेतर काँग्रेसने ही निदर्शने मंत्रालयावर त्यांच्याच सरकारच्या विरोधात करायला पाहिजे होती, असा टोला भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला.

Web Title: "Congress is spreading confusion among the people over the Centre's package."