शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Video - "ये गं ये गं सरी, भाजपा खिसे भरी... सर आली धावून, भाजपा ऑफिस गेले वाहून"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2022 15:11 IST

Congress Sachin Sawant Slams BJP : काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

गणपती विसर्जनानंतर पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील घाट परिसरात अजूनही संततधारा सुरूच असल्याने परिसरातील धरणांतील पाणी पातळी जलद गतीने वाढली आहे. यातच पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे खडकवासला व पानशेत धरणे पूर्ण क्षमतेने म्हणजे १००% भरली आहेत. धरण क्षेत्रामध्ये पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात व येव्यात सतत वाढ होत आहे. याच दरम्यान काँग्रेसने भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. 

"ये गं ये गं सरी, भाजपा खिसे भरी... सर आली धावून, भाजपा ऑफिस गेले वाहून" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत (Congress Sachin Sawant)  यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "येरे येरे पावसा, पुणे पालिकेचा खाल्ला पैसा... पैसा मिळाला मोठा, भाजपा ठरला खोटा... ये गं ये गं सरी, भाजपा खिसे भरी... सर आली धावून, भाजपा ऑफिस गेले वाहून!" असं सावंत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच पावसाचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. 

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा १ हजार ९२९ क्युसेक्स विसर्ग वाढवून ३ हजार ४२४ क्यूसेक्स करण्यात आला आहे. त्यामुळे नदीलगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. नागरिकांनी किंवा पर्यटकांनी नदीपात्रात उतरू नये. तसेच नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत, असे आवाहन धरण प्रशासनाकडून करण्यात आले आहे.  

टॅग्स :Sachin sawantसचिन सावंतcongressकाँग्रेसBJPभाजपाPuneपुणे