Congress, NCP joins second line leaders | काँग्रेस, राष्ट्रवादीत दुसऱ्या फळीतील नेत्यांची घुसमट
काँग्रेस, राष्ट्रवादीत दुसऱ्या फळीतील नेत्यांची घुसमट

- अतुल कुलकर्णी 

मुंबई : युती सरकारच्या कार्यकाळातील शेवटचे अधिवेशन सोमवारपासून सुरु होत आहे. या अधिवेशनात तरी आम्हा तरुणांना पुढे येऊन बोलू द्या, किती दिवस तेच ते नेते सतत बोलत राहणार? आम्ही कधी बोलणार? अशी खदखद काँग्रेस] राष्टÑवादी काँग्रेसमधील तरुण नेत्यांनी बोलून दाखवलीत्न निवडणुका समोर आहेत, आम्ही विरोधात काम करुन दाखवू, संधी तरी द्या अशा भावना या नेत्यांनी बोलून दाखवल्या आहेत.

दोन्ही काँग्रेसच्या एकत्रित बैठकीत ज्येष्ठ नेत्यांमध्ये उत्साह नव्हता. सगळे मिळून लढू, एकत्र काम करु, विषय एकत्रीतपणे लावून धरु, हे बोलण्यापलिकडे फारसे काही घडले नाही. तेच ते चेहरे सोडून दुसरे नेते समोर आणायचेच नाहीत का, असा सवाल बैठकीनंतर काही नेत्यांनी केला. काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांच्या रुपाने दुसºया फळीतला ओबीसी नेता समोर केला. मात्र दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी जितेंद्र आव्हाड, शशीकांत शिंदे, सुनील केदार, यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे, अमित देशमुख, वर्षा गायकवाड अशा दुसºया फळीच्या नेत्यांना पुढे करा, त्यांना बोलू द्या अशी मागणी ज्येष्ठ नेत्यांना केली आहे. आ. आव्हाड आणि आ. केदार यांनी तर एक पत्रच लिहून सगळीकडे पाठवले आहे. हे पत्र कोण्या नेत्यासाठी नसून गाव पातळीपासून राज्य, राष्ट्रीय पातळीपर्यंतच्या नेत्यांसाठी आहे असे या दोघांनी म्हटले आहे.

आ. आव्हाड म्हणाले, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेमध्ये आली व अनेकजण १५ वर्षे मंत्री राहिले. काहींना २० ते २५ वर्षे लाभली. पण, मागची एक पिढी या नेत्यांच्या मागून चालत आहे हे त्यांनी विसरु नये. पुरोगामी विचारांची पुरस्कार करणारी, शाहू, फुले, आंबेडकरांवर प्रेम करणाºया या दुसºया पिढीचे आयुष्य, भविष्य या सगळ्या नेते मंडळींच्या हातात आहे. त्यामुळे पत्राद्वारे आम्ही त्यांना विनंती केली आहे की, तुमच्या मागून चालणाºया पिढीला विश्वास द्या, संधी द्या, तरुण कार्यकर्त्यांना पराभव जिव्हारी लागतो आणि ते उसळून उभे राहतात ही त्यांच्या वयाची किमया असते. या बंडखोरीला फुंकर मारुन जागवायचे काम या नेत्यांना करावे लागेल असेही ते म्हणाले.
केदार आणि आव्हाड म्हणाले, आप-आपसातले मतभेद, पक्षीय राजकारण बंद खोलीत बसून मिटवा. ते वृत्तपत्रासमोर प्रदर्शित होणार नाही याची काळजी घ्या आणि ही लढाई जिंकून महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी विजय नोंदवा अशी कळकळीची विनंती आम्ही केली आहे, कोणत्याही नेत्याने ही व्यक्तीगत घेऊ नये, आमच्या भावना सगळ्यांसाठी आहेत असेही ते म्हणाले.

तावडे यांनी घेतली विरोधी पक्षनेत्यांची भेट
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संसदीय कार्यमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी आ. गणपतराव देशमुख, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, छगन भुजबळ, नसिम खान, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, शेकापचे जयंत पाटील, अबु आझमी, जयंत पाटील हे नेते उपस्थित होते.


Web Title: Congress, NCP joins second line leaders
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.