"आई वडिलांची सेवा करताना सोबत फोटोग्राफर असणं अनिवार्य आहे का?"; काँग्रेस नेत्याचा खोचक सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2022 17:09 IST2022-06-18T17:08:27+5:302022-06-18T17:09:43+5:30
Congress Nana Patole And Narendra Modi : नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी (Heeraben 100th Birthday) यांचा आज १०० वा वाढदिवस साजरा होत आहे.

"आई वडिलांची सेवा करताना सोबत फोटोग्राफर असणं अनिवार्य आहे का?"; काँग्रेस नेत्याचा खोचक सवाल
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मातोश्री हिराबेन मोदी (Heeraben 100th Birthday) यांचा आज १०० वा वाढदिवस साजरा होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर गुजरात दौऱ्यावर असलेल्या नरेंद्र मोदींनी आज सकाळी-सकाळीच गांधीनगर येथील घरी आईचे पाय धुवून दर्शन घेतले. तसेच, मातोश्रींसमवेत घरातील देवांची पूजा-आरतीही केली. सोशल मीडिया अकाऊंटवरुन याचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. याच दरम्यान काँग्रेसने एक खोचक सवाल विचारला आहे.
"आई वडिलांची सेवा करताना सोबत फोटोग्राफर असणं अनिवार्य आहे का?" असं म्हणत नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहं. "आई वडिलांची सेवा करताना सोबत फोटोग्राफर असणं अनिवार्य आहे का? असो! आईंना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना!" असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
आई वडिलांची सेवा करताना सोबत फोटोग्राफर असणं अनिवार्य आहे का ?
— Nana Patole (@NANA_PATOLE) June 18, 2022
असो ! आईंना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना !
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदींनी त्यांच्या मातोश्रींच्या निरोगी आयुष्यासाठी वडनगर येथे काही धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. दुसरीकडे गांधीनगर येथे एका नव्या रस्त्याला त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्रींचं नाव दिलं जाणार आहे. हिराबेन मोदी सध्या नरेंद्र मोदी यांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांच्यासोबत गांधीनगर येथे राहतात.
मोदींचे धाकटे बंधू पंकज मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिराबेन मोदी यांचा जन्म १८ जून १९२३ साली झाला होता. यंदा १८ जून २०२२ मध्ये त्या आपल्या १०० व्या वर्षात पाऊल टाकत आहेत. पंतप्रधान देखील आज गुजरातमध्ये आहेत आणि ते मातोश्रींच्या वाढदिवशी पावागढ मंदिराला भेट देतील.
Took blessings of my mother today as she enters her 100th year... pic.twitter.com/lTEVGcyzdX
— Narendra Modi (@narendramodi) June 18, 2022