Maharashtra Politics: “परमबीर सिंह यांचे १०० कोटी रुपये भाजपलाच मिळाले, निरपराध असलेल्या अनिल देशमुखांना...”
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 16:14 IST2023-02-13T16:13:10+5:302023-02-13T16:14:40+5:30
Maharashtra News: भाजपच्या कोणत्याही मंत्र्याने केलेल्या वक्तव्याला कोणताही अर्थ राहिलेला नाही, अशी टीका करण्यात आली आहे.

Maharashtra Politics: “परमबीर सिंह यांचे १०० कोटी रुपये भाजपलाच मिळाले, निरपराध असलेल्या अनिल देशमुखांना...”
Maharashtra Politics: कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपने कंबर कसली आहे. ही पोटनिवडणूक अपक्ष व्हावी, यासाठी भाजप प्रयत्नशील होता. मात्र, महाविकास आघाडीने भाजपचे आवाहन स्वीकारले नाही आणि उमेदवार देऊन आव्हान दिले. या ठिकाणी प्रचाराला सुरुवात झाली आहे. याच दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप करत भाजपवर सडकून टीका केली.
मीडियाशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, भाजपने जनतेला अनेक आश्वासने दिली. महागाई कमी करू असे सांगितले होते. मात्र महागाई वाढली. दरवर्षी दोन कोटी लोकांना नोकऱ्या देऊ असे सांगितले होते. मात्र आता बेरोजगारी वाढली. शेतकऱ्यांच्या शेतमालाला दीडपट भाव देऊ, असे सांगितले होते. मात्र हा हमीभाव देण्यात आलेला नाही. कोण येणार, कोण जाणार होते? तसेच खोक्याचे राजाकारण सर्वांनाच पाठ झालेले आहे. भाजपच्या या थोतांडाला लोक कंटाळले आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
परमबीर सिंह यांचे १०० कोटी रुपये भाजपलाच मिळालेले होते
भाजपने परमबीर सिंह यांना कोठे लपवले. परमबीर सिंह यांचे १०० कोटी रुपये कोठून आणले? असे प्रश्न आम्ही त्यांना या अधिवेशनातही विचारणार आहोत. परमबीर सिंह यांचे १०० कोटी रुपये भाजपलाच मिळालेले होते. अनिल देशमुख यांच्यासारख्या निरापराध माणसाला दीड ते दोन वर्षे मुद्दामहून तुरुंगात टाकले. त्यांचे राजकीय, सामाजिक आयुष्य संपवले. याचा हिशोब भाजपला द्यावा लागणार आहे. त्यामुळे भाजपच्या कोणत्याही मंत्र्याने केलेल्या वक्तव्याला कोणताही अर्थ राहिलेला नाही, या शब्दांत नाना पटोले यांनी भाजपवर घणाघाती टीका केली.
दरम्यान, निवडणुकीच्या अगोदर मला भाजपात घ्या, असे अनिल देशमुख आम्हाला किती वेळा म्हणाले होते, असे त्यांना विचारा असे विधान भाजप नेते गिरीश महाजन यांनी केले आहे. गिरीश महाजन यांनी केलेल्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. नाना पटोले यांनी समाचार घेतला आहे. भाजपच्या कोणत्याही मंत्र्याच्या विधानांना अर्थ उरलेला नाही. जनतेला दिलेले एकही आश्वासन भाजपा पक्ष पूर्ण करू शकलेला नाही, अशी टीका नाना पटोले यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"