शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Nana Patole : "दहशतवाद, ब्लॅकमेलिंग हा भाजपाचा मूळ व्यवसाय झालाय पण लोकशाहीत..."; काँग्रेसचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 13:46 IST

Congress Nana Patole Slams BJP Devendra Fadnavis : नाना पटोले यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून काही ट्विट करत  भाजपावर निशाणा साधला आहे.

मुंबई - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Congress Nana Patole) यांनी भाजपावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. "दहशतवाद आणि ब्लॅकमेलिंग हा भाजपाचा मूळ व्यवसाय झाला आहे परंतु, लोकशाहीत हे फार काळ टिकणार नाही" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहेत तसेच "देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला देशप्रेम शिकवायची गरज नाही, काँग्रेसच्या नसानसात राष्ट्रभक्ती सामावली आहे" असं देखील म्हटलं आहे. 

नाना पटोले यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून काही ट्विट करत  भाजपावर निशाणा साधला आहे. "दहशतवाद आणि ब्लॅकमेलिंग हा भाजपाचा मूळ व्यवसाय झाला आहे परंतु, लोकशाहीत हे फार काळ टिकणार नाही. दहशत, भय आणि भूक या सर्व गोष्टी घेऊन केंद्रातील सत्ताधारी भाजपा ज्या पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे. त्यांना कधी ना कधी त्यांची जागा पाहायला मिळणार आहे असं म्हणत नाना पटोले यांनी जोरदार टीका केली आहे. 

"देवेंद्र फडणवीसांनी देशप्रेम शिकवायची गरज नाही"

"देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला देशप्रेम शिकवायची गरज नाही. काँग्रेसच्या नसानसात राष्ट्रभक्ती सामावली आहे. ज्यांचे राष्ट्रावर प्रेम नाही तेच मूळ मुद्द्यांवरून लक्ष भरकटवण्यासाठी चुकीची विधाने करतात" असं देखील नाना पटोले यांनी म्हटलं आहे. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्रातील सर्व सरकारी कार्यालयांत अधिकारी व कर्मचारी फोनवर हॅलो न म्हणता वंदे मातरम् म्हणत संभाषणाला सुरुवात करतील असं म्हटलं आहे. मुनगंटीवार यांच्या घोषणेला अनेकांनी विरोध केला आहे. यानंतर आता काँग्रेसने आपल्या कार्यकर्त्यांना आपापसात भेटतांना व जनतेशी संवाद साधतांना 'जय बळीराजा' म्हणावं असं म्हटलं आहे. 

भाजपाच्या 'वंदे मातरम्'नंतर काँग्रेसचं 'जय बळीराजा'; कार्यकर्त्यांना नाना पटोलेंचं आवाहन

"बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे" असं म्हणत काँग्रेसने आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. नाना पटोले यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं होतं. "राष्ट्रगीत - वंदे मातरम् हा आमचा स्वाभिमान आहे, मात्र बळीराजा हा जगाचा पोशिंदा आहे म्हणून यापुढे राज्यातील काँग्रेस नेते - कार्यकर्त्यांनी आपापसात भेटताना व जनतेशी संवाद साधताना ‘जय बळीराजा‘ म्हणावे..." असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा