शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना ठाकरे गट-वंचित युतीवर काँग्रेसची सावध भूमिका; "आधीचे अनुभव वाईट त्यामुळे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 16:25 IST

उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झालीय. प्रकाश आंबेडकरांचा नेमका प्रस्ताव काय हे तुम्ही आम्हाला सांगा असं म्हटलं अशी माहिती पटोलेंनी दिली.

पुणे - शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आली त्याला विरोध करण्याचं कारण नाही. त्यांचे स्वागत आहे. राहिला प्रश्न महाविकास आघाडीचा. तर अद्याप प्रकाश आंबेडकरांकडून मविआला कुठलाही प्रस्ताव नाही. उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झालीय. प्रस्ताव आल्यानंतर आंबेडकरांचे म्हणणे काय त्यावर चर्चा करू. आमची भूमिका सकारात्मक आहे. विरोधात नाही. भाजपाला थांबवणे हे आमचं काम आहे. लहान-मोठ्या सर्वांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका काँग्रेसची आहे. काही अनुभव मागचे आहेत त्यामुळे आम्ही ताकही फुकून पितोय. दोस्तीचा हात पुढे केला तर तो पूर्णच करायची ही भूमिका काँग्रेसची आहे अशी सावध प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. 

नाना पटोले म्हणाले की, उद्धव ठाकरेंसोबत चर्चा झालीय. प्रकाश आंबेडकरांचा नेमका प्रस्ताव काय हे तुम्ही आम्हाला सांगा असं म्हटलं. त्याच्यानंतरच या विषयाबाबत पुढे जाऊ. चर्चा झाली परंतु प्रस्ताव नेमका काय यावर बोलणं नाही. मैत्री करायची असेल तर सगळ्या विषयात स्पष्टता हवी. मीडियाने काय दाखवावे हा त्यांचा प्रश्न आहे. जागावाटपाबाबत प्रस्ताव आल्यावर चर्चा करू. भाजपाला सत्तेतून दूर करणे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तेच काम राहुल गांधी करतायेत. सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन जायचेय. फायदा-तोटा हा भाग नाही. सगळ्यांना एकत्रित आणणे हे आमचे धोरण आहे. मागचे काही अनुभव फार वाईट आहेत. त्यामुळे स्पष्टता असल्यावरच पुढे जाता येईल असं त्यांनी स्पष्ट केले. 

कसबा पोटनिवडणूक लढवण्याची तयारीबिनविरोध निवडणुका व्हाव्यात ही महाराष्ट्राची परंपरा होती. पण जेव्हा राज्यात सत्तापरिवर्तन झाले. त्यात पंढरपूर, देगलूर, कोल्हापूर या सगळ्या निवडणुकीचा अनुभव घेतला तेव्हा भाजपाने त्याठिकाणी उमेदवार उभे केले होते. कसबा मतदारसंघाबाबत अद्याप निर्णय झाला नाही. आमच्याकडे भाजपाचा प्रस्ताव नाही. इच्छुक उमेदवार यांच्याशी गाठीभेटी सुरू आहे. निवडणूक लढवण्याची तयारी आहे. अनेक नेते इच्छुक आहेत. कसबा जागा काँग्रेस लढेल आणि चिंचवड जागा राष्ट्रवादी लढेल असं चित्र आहे. मविआत चर्चा झालीय. त्यामुळे काही अडचण नाही. २-३ तारखेला आमची भूमिका समोर येईल असंही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेNana Patoleनाना पटोले