शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची सोडली साथ! माजी आमदार दिलीप सानंदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत करणार प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 13:22 IST

बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार पडले आहे. तीन वेळा आमदार राहिलेले दिलीप सानंदा यांनी 'हाता'ची साथ सोडली असून, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

Maharashtra Politics latest News: तीन वेळा काँग्रेसचे आमदार राहिलेल्या दिलीप सानंदा यांनी पक्षाला झटका दिला. दिलीप सानंदा यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून, १२ जून रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यादृष्टीने जय्यत तयारी सुरू झाली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांच्याच जिल्ह्यात पक्षाला मोठा धक्का बसला आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा आमदार राहिलेल्या दिलीप सानंदा यांनी पक्षाची साथ सोडली आहे.

वाचा >>“महाराष्ट्र हितासाठी आम्ही कोणताही त्याग करायला तयार”; मनसे युतीवर संजय राऊत स्पष्टच बोलले 

मागील काही महिन्यांपासून त्यांच्या पक्षांतराबद्दल शक्यता व्यक्त केल्या जात होत्या. आता त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून, अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. 

दिलीप सानंदा यांच्या पक्षप्रवेशासाठी तयारी 

मिळालेल्या माहितीनुसार, माजी आमदार दिलीप सानंदा हे १२ जून रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने २५ हजार छत्र्‍या, २५ हजार घड्याळे आणि २५ फोटो अशी तयारी खामगाव मतदारसंघात सुरू आहे. 

दिलीप सानंदा यांनी १९९९, २००४ आणि २००९ असे तीन वेळा खामगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांचे या मतदारसंघात चांगले वर्चस्व राहिलेले आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघात सद्यस्थितीत भाजपचीही ताकद चांगली आहे. त्यात आता अजित पवार पक्षाला बळकटी देण्याचे प्रयत्न करताना दिसत आहे. 

टॅग्स :Dilipkumar Sanandaदिलीपकुमार सानंदाAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसPoliticsराजकारण