शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या नेत्यांनी पटोलेंना रंगेहाथ पकडले, मग थोरात चर्चेला आले; वंचितचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 13:09 IST

VBA Attack on Nana Patole: नाना पटोले माईंड गेम करतो असा आरोप केला, टॉर्चर केले, अपमान केला गेला, असे असतानाही शेवटपर्यंत वंचितला मविआबरोबर घेण्याचा प्रयत्न केला, असा आरोप पटोले यांनी केला होता.

वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी सोबत घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पण वंचितकडून त्यात अडथळे आणले गेले. नाना पटोले माईंड गेम करतो असा आरोप केला, टॉर्चर केले, अपमान केला गेला, असे असतानाही शेवटपर्यंत वंचितला मविआबरोबर घेण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. यावर वंचितने मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

वंचितने वेगळी भूमिका घेतली. पण, वैयक्तिक अपमानापेक्षा देशाचे संविधान व लोकशाही महत्वाचे आहे, असे पटोलेंनी अकोल्यात म्हटले होते. बाळासाहेब मी तुमच्या अकोल्यात येऊन सांगतो अजूनही रस्ते बंद झालेले नाहीत. तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे,  एक जागा की दोन जागा पाहिजेत. नाना पटोले आपल्या जबाबदारीवर देईल. पण, महाराष्ट्रामध्ये मत विभाजन होऊन देशाला बर्बाद करणारी भाजप निवडून नाही आली पाहिजे, अनुयायी म्हणून मी या ठिकाणी स्विकारतो आहे. अर्ज मागे घेण्यापर्यंत वाट आहे, आमचा प्रस्ताव मान्य असेल तर नाना पटोले निर्णय घेईल, अशीही ऑफर नाना पटोलेंनी दिली होती. 

यावर वंचितने प्रत्यूत्तर दिले आहे. नाना पटोले तुम्हाला संविधान वाचवायचेच होते तर आमचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. पुंडकर यांना मविआच्या बैठकीत दीड तास बाहेर का बसवून ठेवले, ते सांगावे, असे आव्हान वंचितने दिले आहे. काँग्रेस आणि आमच्या संबंधांत फूट पाडण्याचे काम करताना जेव्हा तुम्हाला काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पकडले, त्या दिवसापासून काँग्रेसकडून मविआच्या बैठकांना बाळासाहेब थोरात का येऊ लागले? तुम्ही हे देखील अकोला वासियांना सांगावे, असा गौप्यस्फोट वंचितने करत आव्हान दिले आहे. तसेच काल अकोल्यात पटोलेंनी जॉनी वॉकरची जबरदस्त अॅक्टिंग केल्याचीही खिल्ली वंचितने उडविली आहे. 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीcongressकाँग्रेसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४