शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
5
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
6
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
7
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
8
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
9
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
10
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
11
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
12
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
13
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
14
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
15
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
16
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
17
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
18
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
19
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
20
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

भूकंप शब्द बदलला अन् राजकीय भूकंप टळला; वडेट्टीवारांची नाराजी दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 12:13 PM

वडेट्टीवारांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश; थोरातांची दिल्लीवारी यशस्वी

मुंबई: काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांची नाराजी दूर करण्यात अखेर पक्षाला यश आलं आहे. दुय्यम दर्जाचं खातं देण्यात आल्यानं वडेट्टीवार गेल्या पाच दिवसांपासून नाराज होते. अखेर वडेट्टीवारांना मदत आणि पुनर्वसन खातं देण्याचा निर्णय पक्षानं घेतला. वडेट्टीवारांची नाराजी दूर करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात दिल्लीला गेले होते. यावेळी त्यांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. याच भेटीत वडेट्टीवारांना मदत आणि पुनर्वसन खातं देण्याचा निर्णय घेण्यात आला. माजी विरोधी पक्षनेते असलेले विजय वडेट्टीवार दुय्यम खाती देण्यात आल्यानं पाच दिवसांपासून नाराज होते. त्यामुळेच त्यांनी खात्यांचा पदभारदेखील स्वीकारला नव्हता. वडेट्टीवार यांच्याकडे इतर मागासप्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास आणि भूकंप व पुनर्वसन ही खाती देण्यात आली होती. अखेर आज त्यांना मदत आणि पुनर्वसन खातं देण्यात आलं. यानंतर वडेट्टीवारांनी खात्याचा पदभार स्वीकारला. मुंबई महापालिकेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा विजय, भाजपा पराभूत मी पक्षावर नाराज नव्हतो, तर पक्षाला मिळालेल्या खात्यांवर नाराज होतो, असं स्पष्टीकरण वडेट्टीवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दिलं. मदत आणि पुनर्वसन ग्रामीण भागाशी संबंधित खातं आहे. पुनर्वसन खात्याशी शेतकऱ्यांच्या थेट संबंध येतो. त्यांना मदत देण्याचं काम या खात्यामार्फत होतं. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मी मदत आणि पुनर्वसन खात्यासाठी आग्रही होतो, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी खातेवाटप करताना झालेली एक चूक आणि वडेट्टीवारांची नाराजी यावर भाष्य केलं होतं. विजय वडेट्टीवार यांच्याकडे मदत आणि पुनर्वसन हे खातं द्यायचं होतं, मात्र चुकून ते भूकंप पुनर्वसन असं लिहिलं गेलं. ती चूक दुरुस्त केली जाईल, असं अजित पवारांनी सांगितलं होतं. वडेट्टीवार नाराज असल्यानं भाजपानं त्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न केले होते. वडेट्टीवारांनी योग्य निर्णय घ्यावा. आम्ही त्यांचं स्वागतच करू असं म्हणत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना थेट पक्ष प्रवेशाची ऑफरच दिली होती. यानंतर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीत जाऊन पक्षश्रेष्ठींची भेट घेतली. या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्यानं वडेट्टीवारांची नाराजी दूर झाली.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेस