शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 13:38 IST

Foreign Policy: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी परराष्ट्र धोरणावरून सरकारवर टीका केली.

इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे मध्यपूर्वेत युद्धाचे ढग दाटले असतानाच अमेरिकेने या युद्धात उडी घेतली. अमेरिकेने शक्तिशाली बॉम्ब टाकून इराणने जमिनीच्या खाली उभारलेल्या लष्करी सुविधा आणि आण्विक तळ उद्ध्वस्त केले. याच पार्श्वभूमीवर विधानसभेचे आमदार आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तिसऱ्या महायुद्धाची शक्यता व्यक्त केली. तसेच परराष्ट्र धोरणावरून सरकारवर टीका केली. 

विजय वडेट्टीवार म्हणाले की, "तुमचे परराष्ट्र धोरण काय आहे? ते एकदा लोकांसमोर स्पष्ट करा. तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात होऊ शकते. त्यामुळे आपली भूमिका स्पष्ट असली पाहिजे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी देखील हेच म्हटले आहे. इराण आणि इस्रायल यांच्यात संघर्ष सुरू आहे. त्यामुळे आपण कोणासोबत आहोत, हे स्पष्ट केले पाहिजे. आपली परिस्थिती 'शोले' चित्रपटासारखी आहे. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. पण जेव्हा आपण पाठी वळून बघतो, तेव्हा तुमच्या मागे कोणीही नसते.देशाला अशा टप्प्यावर आणू नका. आमचे नेतेही हेच बोलत आहेत."

इराण आणि इस्त्रायल युद्धात अमेरिकेने उडी घेतली. इराणचा आण्विक कार्यक्रम रोखण्यासाठी इस्रायलने सुरू केलेल्या हल्ल्यांदरम्यान अमेरिकेनेही रविवारी पहाटेच्या सुमारास इराणच्या तीन आण्विक केंद्रांवर बंकर बस्टर बॉम्बनी हल्ला केला. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'व्हाइट हाऊस'वरून राष्ट्राला संबोधित करताना इराणच्या आण्विक केंद्रांवर हल्ला करून ती पूर्णपणे नष्ट करण्यात आली असल्याचे सांगितले. त्यामुळे तिसर्‍या महायुद्धाची भिती व्यक्त केली जात आहे. या युद्धात  जगातील इतर देशसुद्धा ओढले जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीIranइराणIsraelइस्रायल