शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

मुन्नाच्या उमेदवारीला बंटीचा खोडा; कोल्हापूरमध्ये आघाडीत आखाडा?

By राजा माने | Updated: February 9, 2019 10:45 IST

सतेज पाटील यांच्यासह अनेक काँग्रेस नेते कोल्हापूरच्या जागेसाठी आग्रही

- राजा मानेमुंबई- २०१४च्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार म्हणून इमाने-इतबारे धनंजय महाडिक यांचे काम केले व निवडून आणले. पण त्या निवडणुकीनंतर जिल्ह्यात भाजपमय वातावरण करायचा प्रयत्न कुणी केला,हे सर्वांनाच माहिती आहे. जे पेरले,तेच उगवते,या उक्ती प्रमाणे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आता कोल्हापूरच्या जागेवर दावा केला आहे.पक्षाने जागा आपल्याकडे घ्यावी,आम्ही जिल्यातील सर्व नेते एकत्र बसून उमेदवार ठरवू व निवडून आणू, असा निर्धार बंटी ऊर्फ आमदार सतेज पाटील यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केला.आम्ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे कोल्हापूरची जागा काँग्रेसला घेण्याची मागणी केली आहे. कारण, जिल्ह्यात काँग्रेसला पोषक वातावरण असून आम्ही काँग्रेसचा उमेदवार निवडून आणू शकतो, आमच्याकडे प्रबळ उमेदवार आहे, असे माजी राज्यमंत्री आणि काँग्रेस नेते आ.सतेज पाटील यांनी म्हटले आहे. आघाडीतील जागावाटपाच्या स्पर्धेत कोल्हापूरसाठी अद्यापही काँग्रेस 'रेस'मध्येच असल्याचे सांगत पाटील यांनी राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार धनंजय महाडिक यांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे येथे 'बंटी विरुद्ध मुन्ना' हा संघर्ष टिपेला पोहोचणार असण्याचे संकेतच दिले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांची लगीनघाई सुरू असल्याने, कुटुंबात लग्न कार्याची धावपळ असतानाही  सतेज पाटील यांनी लोकमतशी संवाद साधला. त्यावेळी आगामी लोकसभा निवडणुका आणि जिल्ह्यातील आघाडीत असलेली बिघाडी याबाबत  आपली आणि पक्षाची भूमिका मांडली. लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी निश्चित झाली आहे. मात्र, अद्यापही काही जागांसाठी एकमत झाले नाही. त्यापैकीच कोल्हापूर लोकसभा मतदार संघाची जागा काँग्रेस की राष्ट्रवादीला हा पेच कायम आहे. याबाबत बोलताना, सतेज पाटील यांनी ही जागा काँग्रेसला मिळावी, अशी इच्छा बोलून दाखवली.सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी जीवाचं रान केलं. मात्र, निकालानंतर जिल्ह्यातील परिस्थिती बदलली, सर्वत्र भाजपमय वातावरण करण्याचे प्रयत्न झाले. त्यामुळे, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका सदस्यांमध्ये आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. आम्ही २०१४ साली जे कष्ट घेतले, त्याचे फळ आम्हाला काय मिळाले, असा सवाल कार्यकर्ते करीत आहेत. त्यामुळे याचे पडसाद उमटणारच. कारण आपण जे पेरतो तेच उगवतो, असे म्हणत सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीला नाव न घेता विरोध दर्शवला आहे. मात्र, शेवटी पक्ष श्रेष्ठींच्या निर्णयानुसार आम्ही काम करू. तरीही, राजकारणात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही सांगता येत नाही, शेवटच्या क्षणापर्यंत काहीही अशक्य नसतं, असे म्हणतं धंनजय उर्फ मुन्ना महाडिक यांची उमेदवारी अद्याप अंतिम नसल्याचे संकेतच पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणात बंटी विरुद्ध मुन्ना असा राजकीय आखाडा पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९kolhapurकोल्हापूरBJPभाजपा