शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस नेते राहुल गांधी भिवंडी न्यायालयात हजर; पुढील सुनावणी ४ एप्रिलला 

By नितीन पंडित | Updated: February 21, 2026 13:57 IST

राहुल गांधी भिवंडीत येणार असल्याने शनिवारी भिवंडीत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

- नितीन पंडितलोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी: आर एस एस संघटनेच्या मानहानी प्रकरणी भिवंडी न्यायालयात दाखल याचिकेच्या सुनावणी साठी लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी शनिवारी  भिवंडी न्यायालयात हजर झाले.या प्रकरणात राहुल गांधी यांनी यापूर्वी दिलेले जामीनदार माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाल्याने न्यायालयात दुसरा जामीन देण्यासाठी ते भिवंडी न्यायालयात हजर झाले होते.भिवंडी न्यायालयातील न्यायाधीश पी एम कोळसे यांच्या न्यायालयात राहुल गांधी उपस्थित झाले होते.यावेळी खटला दाखल करणारे आरएसएसचे राजेश कुंटे देखील न्यायालयात उपस्थित होते.यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांचा जामीन राहुल गांधी यांनी दिला असून पुढील सुनावणी ४ एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती ऍड.नारायण अय्यर यांनी दिली.

कुणालाही न भेटताच राहुल गांधी निघालेराहुल गांधी भिवंडी न्यायालयात येणार असल्याने काँग्रेसचे पदाधिकारी व नवनिर्वाचित नगरसेवक राहुल गांधी यांना भेटण्यासाठी न्यायालयात व परिसरात हजर होते मात्र राहुल गांधी कुणालाही न भेटता राहुल गांधी भिवंडी न्यायालयातून निघून गेले.

१५ मिनिटे आधीच न्यायालयात हजरराहुल गांधी यांच्या प्रकरणाची सुनावणी शनिवारी पावणे अकरा वाजता होती.मात्र ते १५ मिनिटे आधीच न्यायालयात हजर झाले होते.राहुल गांधी नेहमीच न्यायालयाचा आदर करतात,त्यामुळे ते पंधरा मिनिटे आधीच न्यायालयात हजर झाले होते.जामिनीच्या बॉण्डवर सह्या व इतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून ते निघून गेले अशी माहिती ऍड.नारायण अय्यर यांनी दिली.

भिवंडीत चोख बंदोबस्तराहुल गांधी भिवंडीत येणार असल्याने शनिवारी भिवंडीत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

भारतीय कायद्याप्रमाणे जामीन घेणे आवश्यक होते. त्यानुसार राहुल गांधी यांना पुन्हा न्यायालयात सुनावणीसाठी याव लागल. न्यायव्यवस्थेपेक्षा दुसर काही मोठ नाही, हे न्यायालयाने आज सिद्ध केल आहे अशी प्रतिक्रिया याचिकाकर्ते राजेश कुंटे यांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण२०१४ च्या लोकसभा निवडणुक काळात भिवंडी तालुक्यातील सोनाळे येथे आयोजित प्रचार सभेत राहुल गांधी यांनी 'महात्मा गांधी हत्येमागे आर.एस.एस. या संघटनेचा हात असल्याचे विधान केले होते.त्याविरोधात आर एस एस संघटनेचे पदाधिकारी राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात आर एस एस संघटनेची बदनामी झाल्याबद्दल खाजगी फिर्याद दाखल केली आहे.

काळे झेंडे दाखविल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेधमुलुंड टोल नाका परिसरात राहुल गांधी यांना भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले हे अत्यंत निंदनीय आहे.राहुल गांधी यांच्या जीवाला धोका असल्याचे सर्वांना माहीत आहे.अशा परिस्थितीत त्यांना काळे झेंडे दाखवणे चुकीचे आहे.याठिकाणी काहीही विपरीत घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नव्हती.त्यामुळे सरकारचा व पोलीस प्रशासनाचा आम्ही निषेध करतो अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत लाड यांनी दिली.त्यांच्या सोबत उपमहापौर तारिक मोमीन यांनी देखील या घटनेचा निषेध केला.

मानहानीच्या खटल्याला बारा वर्षे लागणे दुर्दैवी- खा.बाळ्या मामा

२०१४ चा मानहानीचा खटला आता २०२६ पर्यंत सुरु आहे , मानहानीचा खटला फास्टट्रॅक कोर्टात लवकरात लवकर निकाली लावणे गरजेचे आहे.मात्र या खटल्याला बारा वर्षे लागली हे चुकीचे आहे अशी प्रतिक्रिया भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Rahul Gandhi Appears in Bhiwandi Court; Next Hearing on April 4

Web Summary : Rahul Gandhi appeared in Bhiwandi court for an RSS defamation case hearing, providing a new surety after the previous one passed away. The next hearing is scheduled for April 4. He did not meet with any Congress workers. A BJP protest was condemned.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी