शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नाना पटोले यांनी सांगितला GDP चा नेमका अर्थ; मोदी सरकारवर केली टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 15:05 IST

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभा सभागृहात चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपली मते मांडल्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी बोलताना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. खासदार मोहन डेलकर आत्महत्या, कोरोना, इंधन दरवाढ आदी मुद्द्यांवरून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

ठळक मुद्देनाना पटोले यांची विधानसभेतून केंद्र सरकारवर टीकाराज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागकोरोना काळात राज्य सरकारने चांगले काम केले - नाना पटोले

मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभा सभागृहात चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपली मते मांडल्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी बोलताना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. खासदार मोहन डेलकर आत्महत्या, कोरोना, इंधन दरवाढ आदी मुद्द्यांवरून केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. (congress leader nana patole criticized central government on various issues at maharashtra legislation)

खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित करत हे प्रकरण गंभीर असून, याची योग्य पद्धतीने चौकशी व्हावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली. कोरोना काळात राज्य सरकारने चांगले काम केले, असे सांगत लॉकडाऊनसाठी सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका नाना पटोले यांनी केली.  यावेळी बोलताना राज्यपालांच्या अभिभाषणाचे स्वागत करताना नाना पटोले यांनी राज्य सरकारने अनेक चांगल्या गोष्टी केल्याचे ते म्हणाले. 

 

 

पंकजा मुंडे यांची मागणी योग्य, धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे: प्रवीण दरेकर

केंद्राचा GDP म्हणजे नेमके काय?

इंधन दरवाढीला केवळ केंद्र सरकारच जबाबदार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेले जीडीपीचे आकडे चुकीचे आहेत, असा दावा नाना पटोले यांनी यावेळी बोलताना केला. GDP वाढवला म्हणजे Gas, Diesel आणि Petrol यांच्या दरात वाढ केली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर निचांकी पातळीवर असताना केंद्र सरकार इंधनावर भरमसाठ करवाढ करून लूट करत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.  

दरम्यान, गेल्या वर्षभरापासून देशात सुरू असलेल्या कोरोनाच्या संसर्गाचे संकट अद्याप टळलेले नाही. या वर्षभरात कोरोनामुळे महाराष्ट्रातही बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोरोनाबाधितांची संख्या आणि कोरोनाबळींमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर पुन्हा एकदा घणाघाती टीका केली आहे.

टॅग्स :Budget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनNana Patoleनाना पटोलेCentral Governmentकेंद्र सरकारcongressकाँग्रेसBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcorona virusकोरोना वायरस बातम्याFuel Hikeइंधन दरवाढ