शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे ८० उमेदवार निश्चित

By admin | Updated: September 10, 2014 03:05 IST

राज्यातील काँग्रेसच्या ८० मतदारसंघांसाठी एकेका उमेदवाराचे नाव छाननी समितीने निश्चित केले असून जवळपास ७४ मतदारसंघांसाठीची नावे अद्याप छाननी समितीच्या पातळीवर ठरलेली नाहीत

यदु जोशी, मुंबईराज्यातील काँग्रेसच्या ८० मतदारसंघांसाठी एकेका उमेदवाराचे नाव छाननी समितीने निश्चित केले असून जवळपास ७४ मतदारसंघांसाठीची नावे अद्याप छाननी समितीच्या पातळीवर ठरलेली नाहीत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. जवळपास २० मतदारसंघ असे आहेत की जिथे प्रत्येकी दोन-दोन नावे छाननी समितीने ठरविली. एकूण १०० मतदारसंघांसाठीची नावे केंद्रीय निवड मंडळाकडे गेल्या आठवड्यात पाठविण्यात आली होती. त्यातील २० मतदारसंघांबाबत छाननी समितीने पुन्हा चर्चा करून एकेकच नाव आपल्याकडे पाठवावे, असे केंद्रीय निवड समितीने सुचविले आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी या निवड समितीच्याही अध्यक्ष आहेत. ७४ मतदारसंघांमध्ये उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच आहे. या ७४ मतदारसंघासह जिथे दोन-तीन नावे आहेत असे २० मतदारसंघ मिळून ९४ मतदारसंघांसाठी एकेक नाव निश्चित करण्यासाठी केंद्रीय नेते मल्लिकार्जून खरगे यांच्या अध्यक्षतेखालील छाननी समितीची बैठक बुधवार किंवा गुरुवारी मुंबईत होणार आहे. खरगे समितीने ठरविलेल्या नावांवर निर्णय घेण्यासाठी केंद्रीय निवड मंडळाची बैठक १३ किंवा १४ सप्टेंबरला दिल्लीत होईल. गणेश विसर्जनानंतर इच्छुकांनी आजपासून नव्याने जोरात प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी राजकीय गॉडफादरमार्फत प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे.