शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाश आंबेडकरांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार, अकोल्यातून अभय पाटील यांना तिकीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 08:33 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: डॉ. पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

मुंबई : अकोला लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने सोमवारी रात्री  डॉ. अभय पाटील यांची उमेदवारी जाहीर केली.  डॉ. पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. वंचित आघाडी मविआमध्ये सहभागी झाली नाही तर डॉ. अभय पाटील हे काँग्रेसचे उमेदवार असतील, असे वृत्त 'लोकमत'ने यापूर्वीच दिले होते.

महाविकास आघाडीबरोबर आंबेडकरांच्या मागील दीड महिन्यापासून जागावाटपाबाबत वाटाघाटी सुरू होत्या. महाविकास आघाडीने आधी चार आणि नंतर सहा जागांचा प्रस्ताव आंबेडकरांसमोर ठेवला होता. मात्र, आपल्याला किती जागा हव्यात याबाबत आंबेडकरांनी भूमिका न मांडता महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आरोप करत थेट आपले उमेदवार जाहीर केले. आधी सात आणि नंतर स्वतःची अकोल्यातून उमेदवारी जाहीर करत एकूण २० उमेदवार आतापर्यंत ‘वंचित’ने जाहीर केले आहेत. हे उमेदवार जाहीर करताना कोल्हापूर, नागपूरसह सात जागांवर आपण काँग्रेसला पाठिंबा देत असल्याचेही आंबेडकरांनी जाहीर केले. 

आंबेडकरांनी सात जागांवर पाठिंबा दिल्यानंतर प्रदेश काँग्रेसनेही आंबेडकरांना अकोल्यात पाठिंबा देण्याबाबतचा प्रस्ताव दिल्लीला पाठवला होता. मात्र, दिल्लीतून सोमवारी थेट डॉ. अभय पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली. 

२०१९ मध्येही रिंगणातडॉ. अभय पाटील यांना काँग्रेसने २०१९ मध्येही उमेदवारी जाहीर केली होती. डॉ. पाटील तेव्हा शासकीय सेवेत वैद्यकीय अधिकारी होते.निवडणूक लढवण्यासाठी शासकीय सेवेचा राजीनामा द्यावा लागतो. डॉ. पाटील यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजीनामाही दिला होता.मात्र, शासनाने तेव्हा त्यांचा राजीनामा स्वीकारला नाही आणि त्यांना उमेदवारी जाहीर होऊनही निवडणूक लढवता आली नव्हती.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरakola-pcअकोलाcongressकाँग्रेसVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४