शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'भाजपच्या मनात खोट, धाडसी निर्णय घेण्याची क्षमता काँग्रेसमध्येच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 17:23 IST

आरक्षणाचा लाभ : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचा प्रस्ताव

यवतमाळ : आदिवासी समाजाशी मिळतीजुळती संस्कृती असलेल्या जातींना तत्सम आरक्षण-सवलती लागू करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तिसरी सूची तयार केली जावी, असा प्रस्ताव अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने दिला आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्यावर पेच निर्माण झाला आहे. आरक्षणाबाबत भाजपा सरकारच्या मनातच खोट असल्याचा संताप धनगर समाजाच्या नेत्यांकडून व्यक्त केल्या जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास परिषदेचे उपाध्यक्ष, माजी मंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. 

मोघे म्हणाले, राज्यात 1980 पासून 27 जातींची एसटीचे आरक्षण लागू करा, अशी मागणी आहे. तर काही जातींनी तिसरी सूची जारी करावी यासाठी लढा चालविला आहे. व्हीजेएनटी, ओबीसीमधील काही जातींची संस्कृती आदिवासी समाजाशी मिळतीजुळती आहे. या जातींचा अनेक वर्षांपासून एसटी संवर्ग लागू व्हावा यासाठी संघर्ष सुरू आहे. महाराष्ट्रात दहा टक्के असलेल्या आदिवासी लोकसंख्येला सात टक्के आरक्षण आहे. एसटीमध्ये सध्या 47 जाती आहेत. त्यात नव्या जाती समाविष्ट केल्यास वर्षानुवर्षे वाद चालेल. त्यातून तत्काळ काहीच निष्पन्न होणार नाही. म्हणूनच यावर पर्याय म्हणून आदिवासी समाजाशी साम्य राखणाऱ्या जातींना आरक्षणाचा लाभ देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तिसरी सूची जारी करावी, त्यासाठी स्वतंत्र आयोग नेमावा, आयोगाच्या अहवालानंतर घटनात्मक दुरुस्ती करावी असा प्रस्ताव परिषदेच्यावतीने अ‍ॅड. मोघे यांनी दिला आहे. आरक्षणाच्या टक्केवारीची मर्यादा ओलांडता येत असल्याचे तामिलनाडू, केरळने दाखवून दिले आहे. त्याच पद्धतीने ते तिसऱ्या सुचीतील यादीला आरक्षण देताना लागू केले जाऊ शकते, असेही अ‍ॅड. मोघे यांनी स्पष्ट केले.

धाडसी निर्णय घेण्याची क्षमता केवळ काँग्रेसमध्येच - मोघेकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. शिवाजीराव मोघे म्हणाले, राष्ट्रीयस्तरावर कोणत्याही पक्षीय नुकसानीचा विचार न करता धाडसी निर्णय घेण्याची क्षमता केवळ काँग्रेसमध्ये आहे. तिसरी सुचीचा निर्णयसुद्धा काँग्रेसच घेऊ शकेल. काँग्रेसने यापूर्वी आदिवासी समाजाचे क्षेत्रबंधन हटविणे, बँकांचे राष्ट्रीयीकरण, सिलिंग कायदा, कूळ कायदा, वनजमिनीचे पट्टे देणे, यासारखे धोरणात्मक व धाडसी निर्णय घेतले आहेत. हे निर्णय घेताना पक्षात फूट पडली मात्र निर्णय बदलविले गेले नाहीत, असेही मोघे यांनी सांगितले. 

टॅग्स :Shivajirao Mogheशिवाजीराव मोघेBJPभाजपाcongressकाँग्रेसreservationआरक्षणTrible Development Schemeआदिवासी विकास योजना