“जय गुजरात म्हणणारे शिंदे हे अमित शाहांचे गुलाम, बाळासाहेबांची शिकवण धुळीस मिळवली”: काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 18:13 IST2025-07-04T18:12:37+5:302025-07-04T18:13:31+5:30

Congress News: महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला नख लावणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली.

congress harshwardhan sapkal criticized deputy cm eknath shinde over saying jay gujarat | “जय गुजरात म्हणणारे शिंदे हे अमित शाहांचे गुलाम, बाळासाहेबांची शिकवण धुळीस मिळवली”: काँग्रेस

“जय गुजरात म्हणणारे शिंदे हे अमित शाहांचे गुलाम, बाळासाहेबांची शिकवण धुळीस मिळवली”: काँग्रेस

Congress News: महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानाचा प्रदेश आहे. स्वराज्यासाठी शिवरायांनी सुरतेवर स्वारी केली होती. छत्रपती शिवरायांच्या राज्यात एकनाथ शिंदेंसारख्या गुलामांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातकडे गहाण ठेवला आहे. सत्तेसाठी लाचार झालेला माणूसच महाराष्ट्रातील कार्यक्रमात जय गुजरातची घोषणा देऊ शकतो. पण स्वाभिमानी मराठी माणूस हे कदापी सहन करणार नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडून पक्ष व चिन्ह गुजरातच्या मालकाने शिंदेंना दिले व मुख्यमंत्रीपदी बसवले त्या शिंदेच्या तोंडून मोदी-शाह स्तुती करणे समजू शकतो. पण आपल्या गुजराती मालकाला खूष करण्यासाठी चक्क जय गुजरात म्हणावे एवढी लाचारी बरी नव्हे. अमित शाह यांचा ‘वफादार’ शिलेदार होण्याच्या नादात एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राची मान शरमेने खाली घातली. महाराष्ट्राच्या सत्तेत एकापेक्षा एक नमुने बसलेत हे पुन्हा एकदा दिसले. एकनाथ शिंदे गुजरातचे नाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत याचा त्यांना विसर पडला का? असा सवाल करत महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. 

मुंबई व महाराष्ट्र विकून गुजरातची तिजोरी भरण्याचे काम

मुंबई व महाराष्ट्र विकून गुजरातची तिजोरी भरण्याचे काम शिंदे करत आहेत. मागील ११ वर्षात महाराष्ट्रातील उद्योग, संस्था, कार्पोरेट ऑफिसेस आणि कोट्यवधी निधी हा फडणवीस आणि शिंदेंमुळेच गुजरामध्ये जात आहेत. वेदांता फॅाक्सकॅान सारखे मोठे प्रकल्प ज्यामुळे महाराष्ट्रात लाखो तरुणांना रोजगार मिळणार होता तो गुजरातला पाठवून दिला. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या करत आहेत, तरुणांना रोजगार नाहीत, महिला सुरक्षित नाहीत, कुपोषण वाढले आहे पण सत्तेतील हे लाचार गुजरातची गुलामी करण्यात व्यस्त आहेत. अशा महाराष्ट्रद्रोह्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, या शब्दांत सपकाळ यांनी हल्लाबोल केला. 

दरम्यान, पुण्यातील गुजराती समुदायाकडून उभारण्यात आलेल्या जयराज स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावर एकत्र आले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात’, अशी घोषणा दिली.

 

Web Title: congress harshwardhan sapkal criticized deputy cm eknath shinde over saying jay gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.