शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसचे ‘दुष्काळी अस्त्र’; विदर्भातील दौऱ्यासाठी नेमली समिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 09:13 IST

राज्याच्या बहुतांश भागात तीव्र स्वरुपाची दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर उपाय योजण्यात राज्य सरकार कमी पडत आहे, असा ठपका ठेवत काँग्रेसने सरकारची कोंडी करण्याची रणनीती आखली आहे.

नागपूर : राज्याच्या बहुतांश भागात तीव्र स्वरुपाची दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर उपाय योजण्यात राज्य सरकार कमी पडत आहे, असा ठपका ठेवत काँग्रेसने सरकारची कोंडी करण्याची रणनीती आखली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी विदर्भातील दुष्काळी भागाचा दौरा करण्यासाठी काँग्रेस आमदार व पदाधिकाऱ्यांची एक समितीच नेमली असून समितीला दौरा केल्यानंतर आपला अहवालही प्रदेश काँग्रेसकडे सादर करायचा आहे.लोकसभा निवडणुकीमुळे दुष्काळी परिस्थिती निवारणाकडे काही अंशी दुर्लक्ष झाले आहे. ही बाब हेरून काँग्रेसने दुष्काळाच्या मुद्यावरून सरकारची कोंडी करण्याची तयारी चालविली आहे. पक्षातर्फे आता दुष्काळी भागाचे दौरे केले जाणार आहेत. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी विदर्भासाठी एक समिती नेमली असून ही समिती तालुक्यातील दुष्काळी भागांना भेट देईल. या समितीच्या दौºयात संबंधित जिल्ह्यातील अध्यक्षांनाही सहभागी करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.अशी आहेविदर्भाची समितीविधानसभेतील उपनेते आ. विजय वडेट्टीवार हे या समितीचे अध्यक्ष आहेत. माजी मंत्री वसंत पुरके, राजेंद्र मुळक, आ. वीरेंद्र जगताप, रणजित कांबळे, सुनील केदार, राहुल बोंद्रे, अमर काळे, नतिकोद्दीन खतीब, अमित झनक व समिती समन्वयक म्हणून प्रवक्ते अतुल लोंढे यांचा समावेश आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसdroughtदुष्काळ