शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; समान निधीवाटपाची केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 02:50 IST

शुक्रवारी पाटील यांनी पक्षातील प्रमुख नेत्यांची व मंत्र्यांची एक बैठक मुंबईत घेतली होती. त्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. काही विषय दिल्लीतील नेतृत्वामार्फत मुख्यमंत्र्यांना सांगण्याचे ठरले होते. मात्र, दिल्लीने आधी तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटा, त्यांच्यासमोर सगळे मुद्दे मांडा, असे सांगितल्यामुळे शनिवारी सकाळी हे शिष्टमंडळ ‘वर्षा’वर पोहोचले.

मुंबई :  किमान समान कार्यक्रमाचा आढावा घ्या तसेच महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही घटक पक्षांच्या आमदारांना समान निधीचे वाटप होते की नाही हे पाहा, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे प्रभारी एच. के. पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन केली.शुक्रवारी पाटील यांनी पक्षातील प्रमुख नेत्यांची व मंत्र्यांची एक बैठक मुंबईत घेतली होती. त्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. काही विषय दिल्लीतील नेतृत्वामार्फत मुख्यमंत्र्यांना सांगण्याचे ठरले होते. मात्र, दिल्लीने आधी तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटा, त्यांच्यासमोर सगळे मुद्दे मांडा, असे सांगितल्यामुळे शनिवारी सकाळी हे शिष्टमंडळ ‘वर्षा’वर पोहोचले. त्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचा समावेश होता. आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे, निधी वाटपात होत असलेला भेदभाव दूर करणे व राज्यातील विद्यमान राजकीय परिस्थितीबाबत यावेळी चर्चा झाली, अशी माहिती नंतर प्रभारी पाटील यांनी दिली.राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती व उपाययोजनांसंदर्भातही यावेळी चर्चा झाली. गरज पडली आणि रुग्णांची संख्या वाढू लागली तर, मुख्यमंत्री जे कोणते निर्णय घेतील त्याला काँग्रेसचा पाठिंबा असेल, असा विश्वासही शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना दिला. राष्ट्रवादीने मात्र लॉकडाऊनविषयी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. शनिवारच्या बैठकीत राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती व किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणी यासंदर्भातही सविस्तर चर्चा झाली.पाटील म्हणाले की, काँग्रेस मंत्र्यांच्या झालेल्या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली होती त्यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा केली. निधी वाटपाबाबत काँग्रेसचे काही आक्षेप आहेत ते त्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच किमान समान कार्यक्रमाबाबत प्रत्येक पक्षाच्या दोन नेत्यांनी एकत्रित बसून आढावा घेतला पाहिजे, अशीही मागणी केली. किमान समान कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी एक समन्वय समिती नेमण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर सकारात्मक चर्चा झाली, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNana Patoleनाना पटोलेBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातAshok Chavanअशोक चव्हाण