शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

युती तुटल्याने काँग्रेसचा विजय सुकर - अशोक चव्हाण

By admin | Updated: January 27, 2017 20:50 IST

शिवसेना भाजपची बेगडी युती तुटल्याने आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विजय सुकर झाला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 27 - शिवसेना भाजपची बेगडी युती तुटल्याने आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विजय सुकर झाला आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे.युती तोडण्याच्या उध्दव ठाकरे यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका करत अशोक चव्हाण म्हणाले की, उध्दव ठाकरे यांनी युती तोडण्याच्या वल्गना करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडावे. उध्दव ठाकरे म्हणाले की आता युती करण्यासाठी कुणापुढे कटोरा घेऊन जाणार नाही म्हणजे यापूर्वी उध्दव ठाकरे हे कटोरा घेऊन उभे होते हे स्पष्ट झाले असून शिवसेना सत्तेसाठी लाचार आहे हे आमचे म्हणणे खरे असल्याचे सिध्द झाले आहे.राज्याच्या इतिहासातील सर्वात अपारदर्शक सरकार चालवणारे पारदर्शकतेच्या गप्पा मारत आहेत. निवडणुकीची गणिते जुळत नाहीत म्हणून वेगवेगळ्या निवडणुका लढवायच्या आणि निवडणुकीतनंतर भ्रष्टाचार करण्यासाठी पुन्हा एकत्र यायचे ही शिवसेना भाजपची कार्यपध्दती आहे. विधानसभा आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षाच्या युती नाट्याचे प्रयोग राज्यातील जनतेने पाहिले आहेत.

मुंबई महापालिकेत गेल्या 22 वर्षात शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रचंड भ्रष्टाचार केला असून युती तोडून तो झाकला जाणार नाही. राज्य सरकारमधील विविध मंत्र्यांचे घोटाळे बाहेर आले असून शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष या भ्रष्टाचारात सामील असल्याचे समोर आले आहे. जनतेमध्ये शिवसेना भाजप विरोधात तीव्र असंतोष असून आगामी निवडणुकांत काँग्रेसचा विजय निश्चित होताच तो आता अधिक सुकर झाला आहे असे खा. चव्हाण म्हणाले.