शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ‘सीएसआर’ची मुभा न देणे हा मोदी सरकारचा दुजाभाव, काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 17:01 IST

सर्व कायदेशीर नियमनांच्या आधीन राहून वर्षानुवर्षे पारदर्शकपणे कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ही परवानगी दिली जात नाही

ठळक मुद्देकोवीड-१९ ची राज्यातील परिस्थिती पाहता केंद्र सरकारने महाराष्ट्राला देय असलेला त्यांच्या हक्काचा निधी तातडीने द्यायला हवा होताकेंद्राने राज्याला दिलेली मदत तुटपुंजी, महाराष्ट्राला भक्कम आर्थिक पाठबळाची गरज उद्योजकांची आपआपल्या राज्यांना मदत करण्याची इच्छा आहे. मात्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दिलेले योगदान सीएसआर अंतर्गत ग्राह्य धरले जाणार नसल्याने उद्योजकांची कुचंबणा

मुंबई - रातोरात तयार झालेल्या आणि ज्याची वैधता व प्रक्रिया अद्याप संशयातीत नाही, अशा पीएम केअर फंडला सीएसआर अंतर्गत निधी स्वीकारण्याची मुभा केंद्र सरकारकडून तातडीने दिली जाते. मात्र सर्व कायदेशीर नियमनांच्या आधीन राहून वर्षानुवर्षे पारदर्शकपणे कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ही परवानगी दिली जात नाही, हा दुजाभाव असल्याची घणाघाती टीका काँग्रेसने केेली आहे.

काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केंद्र सरकारच्या या अन्यायावर कडाडून टीका केली असून, सर्व राज्यांना तातडीने यासंदर्भात अनुमती दिली जावी, अशी मागणी केली आहे. सावंत यांनी आज काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना पत्र लिहून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये सीएसआर अंतर्गत निधी स्वीकारण्याची मुभा मागण्यासाठी केंद्र सरकारकडे आग्रह धरावा, असे म्हटले आहे.

११ एप्रिल रोजी झालेल्या पंतप्रधान व देशातील सर्व मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह इतरही अनेक मुख्यमंत्र्यांनी केवळ पीएम केअर फंडलाच अशी परवानगी देण्याच्या भूमिकेला विरोध केल्याचे समजते. तरीही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सीएसआर अंतर्गत निधी स्वीकारण्याची परवानगी देण्याबाबत पंतप्रधानांनी कोणतेही आश्वासन दिलेले नाही, अशी नाराजी सावंत यांनी आपल्या पत्रात नमूद केली आहे.

कोवीड-१९ ची राज्यातील परिस्थिती पाहता केंद्र सरकारने महाराष्ट्राला देय असलेला त्यांच्या हक्काचा निधी तातडीने द्यायला हवा होता. मात्र, अद्याप राज्य शासनाला तो निधी प्राप्त झालेला नाही. केंद्राने राज्याला दिलेली मदत तुटपुंजी आहे. महाराष्ट्राला भक्कम आर्थिक पाठबळाची गरज असून, सीएसआरमधून हा निधी उभा करणे शक्य आहे. महाराष्ट्रासह देशभरातील उद्योजकांची आपआपल्या राज्यांना मदत करण्याची इच्छा आहे. मात्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये दिलेले योगदान सीएसआर अंतर्गत ग्राह्य धरले जाणार नसल्याने उद्योजकांची कुचंबणा होत असून, केंद्र सरकारचे अनेक मंत्री उद्योजकांवर दबाव आणून त्यांना पीएम केअरमध्ये निधी देण्यास सांगत असल्याचा आरोपही सचिन सावंत यांनी केला.

महाराष्ट्र भाजपने केंद्राकडे वजन खर्ची घालावे!कोरोनासारख्या जागतिक महामारीविरूद्ध संघर्ष करणाऱ्या महाराष्ट्राची झालेली कुचंबणा लक्षात घेता राज्यातील भारतीय जनता पक्षाने केंद्राकडे वजन खर्ची घालावे, असे आवाहन सचिन सावंत यांनी केले आहे. केंद्र सरकारच्या भेदभावामुळे महाराष्ट्राला मिळणारी मोठी संभाव्य मदत पीएम केअर फंडकडे जाते आहे. हा निधी थेट महाराष्ट्राला मिळाला तर कोरोनाविरूद्धची लढाई अधिक सक्षमतेने लढण्यास मोठी मदत होईल. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील या राज्यातील दोन्ही भाजप नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून ही अडचण त्यांच्या निदर्शनास आणून द्यावी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीलाही सीएसआर अंतर्गत थेट आर्थिक मदत स्वीकारण्याची अनुमती मिळवून देण्यासाठी सहाय्य करावे, असे सावंत यांनी म्हटले आहे.महाराष्ट्र भाजपने कोरोनाच्या या संकटात महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान देण्याऐवजी आपली सारी मदत पीएम केअर फंडलाच पाठवली आहे. किमान महाराष्ट्र व मुंबईतील उद्योजकांची मदत तरी थेट राज्याला मिळेल, यासाठी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न करून महाराष्ट्र हिताची भूमिका घ्यावी, असेही काँग्रेस प्रवक्ते सावंत म्हणाले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारcongressकाँग्रेसCentral Governmentकेंद्र सरकार