शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गणेश मुर्तीची विटंबना केल्याप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 20:10 IST

मिरवणूक सुरु असताना कार्यकर्त्यांसह  गणेश मूर्तीची विटंबना केल्याप्रकरणी काँग्रेस नगरसेवक आणि माजी मंत्री रमेश बागवे यांचे पुत्र अविनाश बागवे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना खडक पोलिसांनी अटक केली. 

पुणे : मिरवणूक सुरु असताना कार्यकर्त्यांसह  गणेश मूर्तीची विटंबना केल्याप्रकरणी काँग्रेस नगरसेवक आणि माजी मंत्री रमेश बागवे यांचे पुत्र अविनाश बागवे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना खडक पोलिसांनीअटक केली. गणेश मंडळाची विजर्सन मिरवणुक जात असताना कार्यकर्त्यांना ओढा रे, मारा, सोडू नका असे म्हणून चिथावणी देवुन ट्रॅक्टर चालक व साऊंड सिस्टीमच्या मालकास मारहाण करण्यास सांगणार्‍या तसेच गणेश मुर्तीची विटंबना केल्याप्रकरणी खडक पोलिसांनीकाँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांना अटक केली आहे. त्यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

            या प्रकरणी युवराज सुलतान अडसुळ (27, रा. राजीव गांधी सोसायटी, कासेवाडी, भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अविनाश बागवे, त्यांचे बंधू यासेर बागवे आणि विवेक उर्फ बंटी बागवे, दयानंद अडागळे, जयवंत मोहिते, सुरज कांबळे, कुमार अडागळे, नितीन कसबे, बापु कसबे, गणेश जाधव, बागवे यांचे पीए अरूण गायकवाड, सुरेखा खंडाळे, विठ्ठल खोरात, परेश गुरव, अविनाश बागवे यांचे मेहुणे सुरज कांबळे आणि शिवाजी काळे (सर्व रा. कासेवाडी, भवानीपेठ) यांच्याविरूध्द भादंवि 143,146,148,149,295,296,323,427,504, महाराष्ट्र कायदा कलम 37 (1)(3) सह कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

          याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भवानीपेठेतील कासेवाडी येथील अशोक तरूण मंडळाची मिरवणुक विजर्सनासाठी राजीव गांधी पतसंस्थेच्या समोरील सार्वजनिक रोडवरून जात होती. त्यावेळी बागवे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना ओढा रे, मारा, सोडू नका असे म्हणून चिथावणी दिली. त्यांनी ट्रॅक्टर चालक सोमनाथ मस्के आणि साऊंड सिस्टीमचे मालक ओंकार पंढरीनाथ कोळी यांना मारहाण करण्यास  सांगितले. आरोपींनी मस्के आणि कोळी यांना हाताने मारहाण केली तसेच साऊंड सिस्टीमची तोडफोड करून नुकसान केले. आरोपींनी गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीस अडथळा निर्माण केला. आरोपींनी पायातील बुट, चप्पल, दगड फेकुन गोंधळ घातला आणि मिरवणुकीदरम्यान गणेश मुर्तीची विटंबना केली.या गुन्हयाचा पुढील तपास खडक पोलिस करीत आहेत. 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसPoliceपोलिसArrestअटक