राजीव सातव ठरविणार दिल्लीत काँग्रेसचे उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2019 07:36 IST2019-12-28T07:36:51+5:302019-12-28T07:36:58+5:30
निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

राजीव सातव ठरविणार दिल्लीत काँग्रेसचे उमेदवार
नवी दिल्ली : दिल्ली काँग्रेसच्याविधानसभा निवडणुकीच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे सचिव व माजी खासदार राजीव सातव यांची निवड झाली आहे. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या या नियुक्तीला महत्त्वाचे मानले जात आहे.
राजीव सातव यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी महत्त्वाची भूमिका निभावली होती. यामुळे काँग्रेसने दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडीची जबाबदारी राजीव सातव यांच्यावर सोपविली आहे. सातव हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. १९९८ ते २०१३ पर्यंत सलग १५ वर्षे दिल्लीत सत्ता केलेल्या काँग्रेसचा गेल्या निवडणुकीत एकही उमेदवार विजयी झाला नव्हता. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आपपेक्षा अधिक मते मिळाली होती. यामुळे काँग्रेसला चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे.