शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

RSS च्या बालेकिल्ल्यातून काँग्रेसने फुंकले लोकसभा निवडणुकीचे रणशिंग, अनेक नेत्यांची उपस्थिती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 16:28 IST

नागपुरात काँग्रेसच्या महारॅलीला पक्षातील जवळपास सर्वच प्रमुख नेते उपस्थित आहेत.

Congress :काँग्रेसने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा(RSS) बालेकिल्ला असलेल्या नागपुरातून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. आज(दि.28) काँग्रेसचा 139 वा स्थापना दिवस आहे. या निमित्ताने काँग्रेसने नागपुरात ‘हैं तैयार हम’ महारॅलीचे आयोजन केले आहे. या मेगा रॅलीला राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे संबोधित करतील.

लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने उरले आहेत. काँग्रेसला सलग दोन लोकसभा निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. काँग्रेस आतापर्यंतच्या सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. सध्या काँग्रेस फक्त तीन राज्यांत स्वबळावर सत्तेवर असून तीन राज्यांत मित्रपक्ष म्हणून सामील आहे. अशा स्थितीत 2024 च्या लोकसभा निवडणुका काँग्रेससाठी 'करो या मरो' अशा असणार आहेत. 

राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्ता गमावल्यानंतर काँग्रेसने भाजपची वैचारिक संघटना असलेल्या RSS च्या बालेकिल्ल्यात रॅली काढून 2024 च्या निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात करण्याची रणनीती आखली आहे. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्याशिवाय, पक्षातील 247 प्रमुख नेते, बहुतांश खासदार आणि 600 पैकी सुमारे 300 आमदार या रॅलीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या मेगा रॅलीत किमान 10 लाख लोक जमतील, अशी आशा पक्षाने व्यक्त केली आहे.

काँग्रेसचे महाराष्ट्रावर विशेष लक्षएकीकडे संघाचा बालेकिल्ला असल्याने काँग्रेस नागपुरात मेळावा घेत आहे तर दुसरीकडे राहुल गांधींच्या 'भारत न्याय' यात्रेचा समारोप मुंबईत होणार आहे. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत. काँग्रेसने महाराष्ट्रात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी हातमिळवणी केली आहे. तसेच, राज्यात मराठा-ओबीसी वाद भाजपसाठी चिंतेचे कारण बनू शकते. ही सर्व समीकरणे डोळ्यासमोर ठेऊन काँग्रेसने महाराष्ट्रातून निवडणूक प्रचाराची सुरुवात करत आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूरBJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक