शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
6
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
7
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
8
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
9
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
10
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
11
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
12
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
13
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
14
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
15
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
16
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
17
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
18
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
19
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
20
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
Daily Top 2Weekly Top 5

कॉँग्रेस-भाजपा एकाच नाण्याच्या दोन बाजू -ओवेसी

By admin | Updated: April 1, 2015 02:29 IST

कॉँग्रेसने आतापर्यंत अल्पसंख्याकांना भीती दाखवून मते मिळविली, तर भाजपा दोन समाजांत विद्वेष पसरविणे आणि हिंदू बांधवांच्या भावना

मुंबई : कॉँग्रेसने आतापर्यंत अल्पसंख्याकांना भीती दाखवून मते मिळविली, तर भाजपा दोन समाजांत विद्वेष पसरविणे आणि हिंदू बांधवांच्या भावना भडकविण्याचे राजकारण करीत आहेत. गेल्या १० महिन्यांत पंतप्रधान मोदी यांनी परदेश दौरे काढण्याचा एककलमी कार्यक्रम राबवित ‘अच्छे दिन’च्या आश्वासनाला तिलांजली दिली आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने जनता त्यांच्या आमिषाला बळी पडणार नाही, असे प्रतिपादन ‘एमआयएम’चे आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी खेरवाडीत केले. वांद्रे (पू़) विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार सिराज खान यांच्यासाठी आयोजिलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. खेतवाडीमध्ये कॉँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांचे प्रचार कार्यालय आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण होऊन अनुचित घटना होऊ नये, यासाठी पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला होता. ओवेसी म्हणाले, की आपण भारतीय राज्यघटना मानत असून त्याने दिलेल्या अधिकारानुसार समाजातील अल्पसंख्याक व बहुजनांच्या हितासाठी संघर्ष करीत आहोत. मात्र जातीयवादी शक्ती व कॉँग्रेसकडून आपल्याबद्दल जाणीवपूर्वक गैरसमज पसरविला जात आहे. केंद्रात व महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आल्यानंतर आरएसएस व हिंदुत्ववादी संघटनेच्या नेत्यांनी घटनेविरोधात व भडकाऊ विधाने केलेली आहेत. त्यांच्यावर कारवाई होण्याची गरज असताना सरकारकडून त्यांना अभय देऊन समाजात फूट पाडण्याचे काम सुरू आहे. या वेळी उमेदवार सिराज खान यांनी आपण मोठ्या मताधिक्याने विजयी होण्याचा आत्मविश्वास व्यक्त केला. (प्रतिनिधी)