थोरात-विखे विधानसभेत भिडले; विधानसभा अध्यक्ष नार्वेकर मधे पडले, सभागृहात नेमके काय घडले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 14:38 IST2023-08-02T14:35:02+5:302023-08-02T14:38:00+5:30
Maharashtra Monsoon Session 2023: बाळासाहेब थोरात आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात प्रश्नोत्तराच्या फैरी झडल्या.

थोरात-विखे विधानसभेत भिडले; विधानसभा अध्यक्ष नार्वेकर मधे पडले, सभागृहात नेमके काय घडले?
Maharashtra Monsoon Session 2023: महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अनेकविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांचे आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच सभागृहात काँग्रेसचे बाळासाहेब खोरात आणि भाजप नेते तसेच महसूल मंत्री एका मुद्द्यावरून विधानसभेत भिडले. यात काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी एक मागणी केली. यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मध्यस्थी करत खोचक टोला लगावला.
माजी महसूल मंत्री थोरातांनी वाळू-रेती लिलावबाबत सभागृहात अनेक प्रश्न उपस्थित केले. दरम्यान त्यांच्याच जिल्ह्यातील सध्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. या प्रश्नांवर खूप वेळ दोघांचे प्रश्नोत्तर सुरू होती. शेवटी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सभागृहात उठून अध्यक्षांना उद्देशून विखेंना एक थेट प्रश्न विचारला.
एकत्र बसून हा प्रश्न मार्गी लावाल का, राधाकृष्ण विखे यांना सवाल
हा प्रश्न सर्व महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाचा आहे. वाळू संदर्भात अनेक वेळा सभागृहात प्रश्न उपस्थित करण्यात आला. अध्यक्ष महोदय विद्यामन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे आहेत आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे दोघेही मातब्बर नेते आहेत. एकाच जिल्ह्यातील ते शेजारी आहेत. त्यामुळे इतरांना बोलवण्यापेक्षा आपण बाळासाहेब थोरातांना बोलवून, आपण दोघेच एकत्र बसून हा प्रश्न मार्गी लावाल का असा माझा प्रश्न राधाकृष्ण विखे यांना आहे, असे अशोक चव्हाण यांनी विचारले.
दरम्यान, यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही सूचना स्वागतार्ह असल्याचे म्हणत त्यांच्या विनंतीला मान दिला. मात्र त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हे दोघे एकत्र बसले तर दुसरा प्रश्न निर्माण होऊ नये, अशी कोपरखळी मारली, यावरू सभागृहात एकच हशा पिकला.