शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

“अद्दल घडवा, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा”; काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 17:34 IST

Congress Atul Londhe News: कडक कारवाई करण्याची धमक सरकारने दाखवावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

Congress Atul Londhe News: पुण्यात सात महिन्याच्या गर्भवती महिलेचा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे बळी गेला, ही घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. जनतेत मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरीपणा विरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पण ना सरकार ना पोलीस प्रशासन कोणीही योग्य ती कारवाई केलेली नाही. या मातेचा मृत्यू दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणा व मुजोरपणाचा बळी असून संबंधित डॉक्टर व रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

यासंदर्भात संताप व्यक्त करत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले की, पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे धर्मादाय नोंदणी असलेले रुग्णालय आहे,  जनतेच्या कराच्या पैशातून ते उभे राहिले आहे, सरकारने या रुग्णालयाला एक रुपयाने जमीन दिली आहे. पण या रुग्णालयात सामान्य लोकांना लुटण्याचे काम होत आहे. मयत तनिषा भिसे यांच्या नातेवाईकांना रुग्णालयाने २० लाख रुपयांचा खर्च येईल व १० लाख रुपये आधी भरा असे सांगितल्याचे समजते. २० लाख रुपये एवढी मोठी रक्कम मध्यमवर्गीय कुटुंबालाही परवडणारी नाही. पैशासाठी या रुग्णालयाने एका मातेचा बळी घेतला आहे, दोन बालके आईच्या प्रेमाला व दुधाला मुकली आहेत, हे अत्यंत गंभीर आहे, अशी टीकाही लोंढे यांनी केली.

कडक कारवाई करण्याची धमक देवेंद्र फडणवीस सरकारने दाखवावी

या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करण्याचा कांगावा रुग्णालय प्रशासन करत आहे, त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. अशा मुजोर रुग्णालयावर कठोर कारवाई झाली पाहिजे जेणेकरून पुन्हा कोणते बाळ आईच्या मायेला पोरके होणार नाही, अशी कडक कारवाई करण्याची धमक देवेंद्र फडणवीस सरकारने दाखवावी, असेही अतुल लोंढे म्हणाले.

दरम्यान, पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी कारवाई केली आहे. रुग्णालयातील घटनेबाबत चौकशी समिती नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही समिती या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे. रुग्णालयातील प्रकारची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी धर्मादाय सहआयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसhospitalहॉस्पिटलDeenanath Mangeshkar Hospitalदीनानाथ मंगेशकर रुग्णालय