छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला मदत करणारे कोण? काँग्रेसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 16:43 IST2025-03-28T16:41:12+5:302025-03-28T16:43:29+5:30

Prashant Koratkar News: महिनाभर प्रशांत कोरटकरला खरी मदत कोण करत होते, ते पुढे का येत नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

congress atul londhe asked who helped prashant koratkar who insulted chhatrapati shivaji maharaj | छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला मदत करणारे कोण? काँग्रेसचा सवाल

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला मदत करणारे कोण? काँग्रेसचा सवाल

Prashant Koratkar News:छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरची पुन्हा एकदा पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. प्रशांत कोरटकरला  काही दिवसांपूर्वी तेलंगण येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. कोल्हापूर सत्र न्यायालयात सुनावणीसाठी आणण्यात आलेल्या प्रशांत कोरटकरवर वकिलाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मोठा पोलिस बंदोबस्त असताना देखील कोरटकरवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने न्यायालय परिसरात खळबळ उडाली. न्यायालयाने कोरटकरच्या पोलिस कोठडीत दोन दिवसाची वाढ केली. प्रशांत कोरटकर प्रकरणी काँग्रेसने सरकारला सवाल केला आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकला तेलंगणातील मंचरेला येथून अटक करण्यात आल्याचे सरकारने जाहीर केले आहे. परंतु अटक केली त्यावेळी कोरटकर सोबत मुख्यमंत्री कार्यालतील एक कर्मचारी होता, त्यांना सोबत घेऊनच कोल्हापूर पोलीस आले, हे खरे आहे का? याचा खुलासा करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. 

महिनाभर प्रशांत कोरटकरला खरी मदत कोण करत होते, ते पुढे का येत नाही

महिनाभर प्रशांत कोरटकरला खरी मदत कोण करत होते, ते पुढे का येत नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे. प्रशांत कोरटकरच्या अटकेसंदर्भात काही माहिती का लपवली जात आहे? हा प्रश्न पडला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे खरे प्रेमी असाल तर गृहमंत्र्यांनी सर्व माहिती जाहीर करावी. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर महिनाभर लपून बसला होता, त्याला कोणी साथ दिली, कोणाच्या आशिर्वादाने तो लपला होता याची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत आणि महाराष्ट्राच्या जनतेला ती जाणून घेण्याचा हक्क आहे, असे अतुल लोंढे म्हणाले.

दरम्यान, कोरटकर याचे बुकीमालकाचे संबध आहेत. त्याचा तीन राज्यात वावर होता, त्याला अजून कोणत्या संघटना, व्यक्ती मदत करत आहेत का, फरार काळात त्याने पाच ते सहा हॉटेलमध्ये मुक्काम, फिरण्यासाठी चारचाकी गाडीचा वापर केला आहे, त्याचे आणखी कोणाशी हितसंबध आहेत का, याचा तपास होण्यासाठी पोलीस कोठडीत वाढ मिळावी, अशी मागणी ॲड. असीम सरोदे आणि सरकारी वकील सूर्यकांत पोवार यांनी केली.

 

Web Title: congress atul londhe asked who helped prashant koratkar who insulted chhatrapati shivaji maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.