महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रभारीपदी मल्लिकार्जुन खर्गे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 13:51 IST2018-06-22T13:51:06+5:302018-06-22T13:51:06+5:30

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खर्गे यांची नियुक्ती

Congress appointed Mallikarjun Kharge as the Maharashtra Congress in charge | महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रभारीपदी मल्लिकार्जुन खर्गे

महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रभारीपदी मल्लिकार्जुन खर्गे

नवी दिल्ली: लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी मोहन प्रकाश यांच्याकडे प्रदेश काँग्रेसचं प्रभारीपद होतं. मात्र लोकसभा निवडणुकीला एका वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना ही जबाबदारी खर्गे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी खर्गे यांची नियुक्ती केली आहे. 

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी जे. डी. सिलम आणि महेंद्र जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सहसचिवपदाची जबाबदारी शशिकांत शर्मा यांच्याकडे देण्यात आली आहे. याशिवाय मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, ओदिशा आणि मिझोरमसाठी स्क्रिनिंग कमिटीचीही नियुक्ती करण्यात आली आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान आणि मिझोरमध्ये या वर्षाच्या अखेरीस निवडणूक होणार आहे. तर ओदिशामध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होईल. 
 

Web Title: Congress appointed Mallikarjun Kharge as the Maharashtra Congress in charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.