शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

महाआघाडीत काँग्रेसला नको मनसेची साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 09:02 IST

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाविरोधातील महाआघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या समावेशावरून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणातणी सुरू झाली आहे.

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाविरोधातील महाआघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या समावेशावरून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणातणी सुरू झाली आहे. महाआघाडीत मनसेला सामील करून घेण्याची भूमिका राष्ट्रवादीने मांडली आहे, तर उत्तर भारतीयांची मते गमाविण्याच्या भीतीपोटी काँग्रेसने मनसेला विरोध केला आहे.मुंबई, पुणे आणि नाशिकसह राज्यातील विविध भागांत विशेषत: शहरी पट्ट्यात राज ठाकरे यांना मानणारा वर्ग आहे. या मतदाराला आपल्याकडे वळविण्यासाठी मनसेला महाआघाडीत सामील करून घेण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीने काँग्रेसला दिला होता. काँग्रेसने मात्र या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शविला आहे. मनसेला सोबत घेण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रस्ताव आला आहे. मात्र, मनसेला सोबत घेण्याबाबत काँग्रेसचा केंद्र आणि राज्यस्तरावर विरोध असल्याचे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी स्पष्ट केले आहे. मनसे महाआघाडीचा भाग नसेल. मनसे आणि आमची विचारधारा जुळत नाही. मनसे कायद्याचे पालन करत नाही, हिंसेचे राजकारण करतात. २०१४ मध्ये राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता, आताही त्यांनी मोदींनाच पाठिंबा द्यावा.भाजपाचे आणि मनसेचे जवळचे संबंध असल्याचा आरोपही निरुपम यांनी केला. उत्तर भारतीय मतदारांमध्ये राज ठाकरे यांची प्रतिमा खलनायकापेक्षा कमी नाही. उत्तर भारतीय हे काँग्रेसचे परंपरागत मतदार आहेत. गेल्या निवडणुकीत हे मतदार भाजपासोबत गेले होते. या वेळी ते पुन्हा काँग्रेससोबत येण्याची शक्यता आहे. अशा वेळी राज ठाकरे यांना सोबत घेतल्यास उत्तर भारतीय मतदार पुन्हा नाराज होतील आणि याचा फायदा भाजपालाच होईल, असेही संजय निरुपम म्हणाले.मुंबईत काही दिवसांपूर्वीच काँग्रेस-राष्ट्रवादीची आगामी निवडणुकीसंदर्भात बैठक पार पाडली. या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मनसेला सोबत घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्याला राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांनी समर्थन दिले होते. शिवडी, दादरसारख्या राज्यातील किमान २५ विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अस्तित्व नाही, अशा जागा मनसेला सोडून शहरी भागातील राज ठाकरेंची मते आघाडीकडे वळविता येऊ शकतात. यात आघाडीचाच फायदा होईल, अशी भूमिका राष्ट्रवादीने मांडली. काँग्रेसने उत्तर भारतीय मतांचा मुद्दा पुढे केला असला, तरी त्यात काही दम नाही. उत्तर भारतीय मते काँग्रेसकडे वळतील, अशी चिन्हे सध्या दिसत नसल्याची भूमिकाही राष्ट्रवादीने मांडली होती. काँग्रेसने मात्र मनसेच्या समावेशाला तीव्र विरोध दर्शविला आहे.>निर्णय राज ठाकरे हेच घेतील - मनसेनिवडणुकीसाठी आघाडी करायची का, करायची असेल तर कोणासोबत करायची, याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेच निर्णय घेतील, अशी सावध प्रतिक्रिया मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी महाआघाडीबाबत बोलताना दिली.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस