'मागील 5 वर्षांतील गोंधळ उघड होऊ नये म्हणूनच विधीमंडळात विरोधकांचा गोंधळ'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 10:52 AM2019-12-18T10:52:47+5:302019-12-18T10:53:24+5:30

भाजप नेत्यांनी मागील पाच वर्षाच्या सत्ताकाळात घातलेला गोंधळ जगासमोर येऊ नये म्हणून विरोधक गोंधळ घालत आहेत. यावेळी सुप्रिया सुळे यांनी जामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा निषेध केला.

'Confusion of opposition in legislature so as not to reveal confusion in last 5 years' | 'मागील 5 वर्षांतील गोंधळ उघड होऊ नये म्हणूनच विधीमंडळात विरोधकांचा गोंधळ'

'मागील 5 वर्षांतील गोंधळ उघड होऊ नये म्हणूनच विधीमंडळात विरोधकांचा गोंधळ'

Next

मुंबई - मागील पाच वर्षांच्या सत्ताकाळात देशात आणि राज्यात घातलेला गोंधळ जगासमोर येऊ नये म्हणून राज्याच्या विधानसभेत विरोधक आणि संसदेत केंद्रातील मोदी सरकार गोंधळ घालत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती येथे केला. 

नागपूर येथे विधीमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. विधीमंडळात पहिल्या दिवशी विरोधकांनी वि.दा. सावरकर यांच्याविषयी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून रान उठवले होते. त्यामुळे पहिल्या दिवशीचे कामकाज होण्यास अडचण निर्माण झाली होती. दुसऱ्या दिवशी विरोधकांनी शेतकरी प्रश्नी गोंधळ घातला. त्यामुळे कामकाज करण्यात अडचणी आल्या होत्या. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात विरोधक आक्रमक झाले होते. त्यावर शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

दरम्यान भाजप नेत्यांनी मागील पाच वर्षाच्या सत्ताकाळात घातलेला गोंधळ जगासमोर येऊ नये म्हणून विरोधक गोंधळ घालत आहेत. यावेळी सुप्रिया सुळे यांनी जामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जचा निषेध केला. देशाची खालावत चाललेल्या आर्थिक स्थितीची राज्यातील विरोधी पक्षाला आणि केंद्रातील मोदी सरकारला चिंता नसल्याचे त्यांनी नमूद केले. देशातील उद्योग बंद पडत असून बेरोजगारी वाढत असल्याकडे सुळे यांनी यावेळी लक्ष वेधले. 
 

Web Title: 'Confusion of opposition in legislature so as not to reveal confusion in last 5 years'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.