मोफत वीजवरून महाविकास आघाडीमध्ये संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 10:06 AM2020-02-12T10:06:52+5:302020-02-12T10:06:57+5:30

राज्यात विजेचा दरमहा 100 युनिटपर्यंत वापर करणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज देण्याच्या निर्णयावर राज्य सरकार विचाराधीन असल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी 6 फेब्रुवारीला ‘लोकमत’ला दिली होती.

 Confusion maharashtra vikas aghadi with free electricity | मोफत वीजवरून महाविकास आघाडीमध्ये संभ्रम

मोफत वीजवरून महाविकास आघाडीमध्ये संभ्रम

googlenewsNext

मुंबई : राज्यात विजेचा दरमहा 100 युनिटपर्यंत वापर करणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज देण्याच्या निर्णयावर राज्य सरकार विचाराधीन असल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी 6 फेब्रुवारीला ‘लोकमत’ला दिली होती. याचा आराखडा तयार करण्याची सूचना केल्याचेही त्यांनी सांगितले, होते. मात्र मोफत वीजवरून महाविकास आघाडीमध्ये संभ्रम असल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यातही १०० युनिटपर्यंत मोफत वीज - नितीन राऊत

'शंभर युनिटपर्यंतची वीज मोफत देण्याबाबतचे वृत्त वाचले. असा फुकटचा धंदा राज्य सरकारने करू नये,' असे अर्थमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कार्यक्रमात बोलताना म्हटले होते. त्यामुळे नितीन राऊत यांची ही मोफत भेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रुचली नसल्याचे बोलले जात आहे.

सरकारने फुकटचा धंदा करू नये, वीज मोफत निर्णयावर दादा संतापले

तर राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नितीन राऊत यांच्या प्रस्तावाचे समर्थन केले आहे. नितीन राऊत हे अभ्यास करत आहेत. गरीबांना मोफत वीज देता येईल का, याचा अभ्यास ते करत आहेत. सध्या याची चाचपणी सुरु असून त्यामध्ये काहीच गैर नाही, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. त्यामुळे मोफत वीज देण्याच्या प्रस्ताववरून महाविकास आघाडीमध्ये संभ्रम असल्याचे पाहायला मिळत आहे.

Web Title:  Confusion maharashtra vikas aghadi with free electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.