उत्तर प्रदेशमध्ये कन्हैया कुमारच्या कार्यक्रमात गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 23:34 IST2017-11-10T23:34:27+5:302017-11-10T23:34:38+5:30
उत्तर प्रदेशमध्ये कन्हैया कुमारच्या कार्यक्रमात एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. लखनौमधील शिरोज हँगआऊटमध्ये लिटररी फेस्टिव्हलमध्ये जेएनयू विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष असलेल्या कन्हैया कुमारला

उत्तर प्रदेशमध्ये कन्हैया कुमारच्या कार्यक्रमात गोंधळ
लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये कन्हैया कुमारच्या कार्यक्रमात एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. लखनौमधील शिरोज हँगआऊटमध्ये लिटररी फेस्टिव्हलमध्ये जेएनयू विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष असलेल्या कन्हैया कुमारला मंचावर बोलावताच गोंधळ सुरू झाला. कार्यक्रमात उपस्थित असलेल्या एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी "देश का गद्दार" आणि ''कन्हैया मुर्दाबाद"च्या घोषणा देण्यास सुरुवात केली.
कार्यक्रमात गोंधळ वाढू लागल्यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) आणि कन्हैया कुमारच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली. त्यामुळे कार्यक्रमात गोंधळ माजला. त्यादरम्यान वंदे मातरम् आणि जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. त्याबरोबरच कन्हैया कुमार परत जा च्या घोषणाही एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.