शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
2
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
3
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
4
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
5
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
6
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
7
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
8
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
9
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
10
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
11
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
12
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
13
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
14
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
15
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
16
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
17
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
18
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
19
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
20
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

आठवलेंच्या सभेत गोंधळ; 150हून अधिक कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 9:07 PM

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सभेत घोषणाबाजी करून खुर्च्यां फेक करणा-या सुमारे १५०हून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

औरंगाबाद : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सभेत घोषणाबाजी करून खुर्च्यां फेक करणा-या सुमारे १५०हून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार वर्धापन सोहळ्याचा कार्यक्रमप्रसंगी रात्री सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली.कोरेगाव-भीमा येथील घटनेचे तीव्र पडसाद १ ते ३ जानेवारीदरम्यान औरंगाबादेत उमटले होते. विविध ठिकाणी झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेनंतर पोलिसांनी १२५हून अधिक दंगलखोरांना अटक केली. विविध पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात अटक होण्याच्या भीतीपोटी शहरातील अनेक तरुण भूमिगत झाले आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार वर्धापन सोहळ्यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. या कार्यक्रमासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे विद्यापीठ गेट परिसरात आयोजित पक्षाच्या कार्यक्रमास उपस्थित होते.नामविस्तार वर्धापनदिन सोहळा एकाच व्यासपीठावरून साजरा करण्यासाठी रिपाइंचे विविध पक्ष, संघटनांनी एक व्यासपीठ उभारले होते. या व्यासपीठावर न येता आठवले यांनी त्यांच्या पक्षाने उभारलेल्या व्यासपीठावर गेले. ही बाब खटकल्याने शंभर ते दिडशे कार्यकर्त्यांनी आठवले यांच्या सभेच्या ठिकाणी जाऊन त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यापैकी काही कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची फेकाफेकी सुरू केली. वारंवार आवाहन करूनही घोषणाबाजी थांबत नसल्याने शेवटी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, सहायक पोलीस आयुक्त नागनाथ कोडे आणि अन्य अधिकारी कर्मचा-यांनी घोषणाबाजी करणा-या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यामुळे मात्र काही काळ या कार्यक्रमात व्यत्यय आला होता. यानंतर आठवले यांची सभा शांततेत पार पडली.याविषयी बोलताना सहायक पोलीस आयुक्त कोडे म्हणाले की, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सभेत घोषणाबाजी करणा-या १०० ते १५० कार्यकर्त्यांना आम्ही ताब्यात घेतले. त्यानंतर माननीय मंत्रीमहोदयांची सभा व्यवस्थित पार पडली.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेAurangabadऔरंगाबाद