प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांची अस्तित्वासाठी कडवी झुंज
By Admin | Updated: October 8, 2014 03:30 IST2014-10-08T03:30:39+5:302014-10-08T03:30:39+5:30
रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघातील सात विधानसभा मतदार संघापैकी सद्यस्थितीत शेकापचे अलिबागमध्ये मिनाक्षी पाटील,
प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांची अस्तित्वासाठी कडवी झुंज
रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघातील सात विधानसभा मतदार संघापैकी सद्यस्थितीत शेकापचे अलिबागमध्ये मिनाक्षी पाटील, पेण मध्ये धैयर्शिल पाटील व उरण मध्ये विवेक पाटील असे तिन आमदार आहेत तर पनवेल मध्ये काँग्रेसचे (आणि आता भाजपात दाखल) प्रशांत ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत मध्ये सुरेश लाड व श्रीवर्धन मध्ये सुनील तटकरे हे आमदार आहेत तर शिवसेनेचे एकमेव महाड मध्ये भरत गोगावले हे आमदार आहेत. युती आणि आघाडीच्या फूटीनंतर आता होत असलेल्या पंचरंगी आणि बहूरंगी विधानसभा निवडणूकीत सर्वच प्रस्थापीत पक्षांच्या उमेदवारांना अस्तित्व सिद्धतेकरीता अत्यंत कडवी झुंज द्यावी लागत आहे.
अलिबाग मधील विद्यमान शेकाप आमदार मिनाक्षी पाटील यांच्या ऐवजी यावेळÞी त्याचे व शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील यांचे बंधू रायगड जि.प.माजी अध्यक्ष व विद्यमान जि.प.प्रतोद सुभाष तथा पंडीतशेठ पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे याच्यावर फसवणूकीचा ठपका ठेवून राष्ट्रवादीला रामराम ठोकून शिवसेनेतून रिंगणात उतरलेले महेद्र दळवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅड.महेश मोहिते, भाजपाचे प्रकाश काठे, काँग्रेसचे मधुकर ठाकुर या प्रमुख उमेदवारां बरोबरच जनता दल (युनायटेड)चे नामसाधर्म्याचे महेंद्र हरी दळवी, बसपाचे अनिल गायकवाड, बहुजन विकास आघाडीचे श्रीनिवास सत्यनारायण मट्टपरती आणि सात अपक्ष उमेदवारांचे आव्हान आहे. रायगड जिल्हा परिषदेत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व शेकाप सलोख्याच्या पार्श्वभूमीवर शेकापचे सुभाष तथा पंडीतशेठ पाटील यांना विजयाची संधी अधिक असल्याचा दावा राजकीय विष्लेशकांचा आहे.
श्रीवर्धन विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला मानला जातो. यावेळÞी त्यांचे पुतणे राष्ट्रवादी काँग्रेस अवधुत अनिल तटकरे रिगणात असून त्यांना काँग्रेसचे उदय भिवाजी कठे, शिवसेनाचे रविंद्र रामजी मुंढे,भाजपाचे कृष्णा पांडुरंग कोबनाक, शेकाप अस्लम ईब्राहीम राऊत आणि नामसाधर्म्याचे अपक्ष उमेदवार सुनील शाम तटकरे या प्रमुख उमेदवारां बरोबरच संघराज पां. गायकवाड (बसपा), दानिश नईम लांबे (बहुजन मुक्ती पार्टी) व दोन अपक्ष उमेदवारांचे आव्हान आहे.
महाड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार भरत गोगावले पून्हा यावेळÞी रिगणात आहेत मात्र त्यांना यावेळी मोठी कडवी झूंज द्यावी लागणार आहे. मागच्यावेळÞी भाजपा व आणि राष्ट्रवादीच्ता तथाकथीत पाठिंब्यामुळे ते विजयी झाल्याचे राजकीय गणीत सांगीतले जात होते परंतू आता ते नाही. परिणामी गोगावले यांना काँग्रेसचे माणिक जगताप, मनसेचे सुरेंद्र चव्हाण, भाजपाचे सुधीर महाडिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे उदय आंबोणकर, बहुजन मुक्ती पार्टीचे मंगेश हुमणे व अपक्ष लक्ष्मण निंबाळकर यांचे यांचे आव्हान राहाणार आहे. मात्र यावेळÞी प्रचंड जनसंपर्क आणि सातत्याच्या जोरावर शिवसेनेचे भरत गोगावले यांनाच बहूदा यावेळÞी मतदार पून्हा संधी देतील असे चित्र आहे.
कर्जत विधानसभा मतदार संघातील विद्यामान आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड यांना महेंद्र थोरवे (शेकाप), बापू खारीक (काँग्रेस), हनुमंत पिंगळे (शिवसेना), राजेद्र येरुणकर (भाजपा), रुपेश डोळस(बसपा), जगन्नाथ पाटील(मनसे) व लिला ढूमणे (अपक्ष) यांचे आव्हान असले तरी शेकाप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सलोख्यातून जि.प.अध्यक्षपदी विराजमान झालेले कर्जत तालुक्यांतील राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश टोकरे आणि लाड यांना सुनील तटकरे यांचा असलेला पाठींबा या जमेच्या बाजूवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड पून्हा एकदा विधानसभेत जातील असे चित्र आहे.