शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

देशभरातील कामगारांची अवस्था दयनीय; मूळगावी परतण्यासाठी त्यांना पूर्ण सुविधा द्या : मेधा पाटकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 13:40 IST

सर्व स्थलांतरित कामगारांचे प्रश्न सोडवावेत.

ठळक मुद्देभोसरी, चिंचवड येथील कष्टकऱ्यांच्या समजून घेतल्या अडचणीरेशन दुकानास भेट देऊन त्यांच्याकडे आलेला साठा व वितरण याबाबत घेतली माहिती

पिंपरी : देशभरातल्या कष्टकरी कामगारांची अवस्था दयनीय असून त्यांना लॉकडाउन काळातील वेतन मिळाले पाहिजे त्यांना इच्छित स्थळी जाण्याची सुविधा केली पाहिजे. निघाल्यापासून ते पोहचेपर्यंत मोफत प्रवास व त्यांना अन्न, पाण्याची सुविधा मिळावी. वैद्यकीय तपासण्या मोफत कराव्यात. सर्व स्थलांतरित कामगारांचे  प्रश्न सोडवावेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन जन आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी भोसरी येथे केले. मेधा पाटकर यांनी रविवारी पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी, चिंचवडसह इतर ठिकाणी परप्रांतीय कामगार वस्ती, कंपनी कामगार अशा कामगारांची भेट घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतले. नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते तसेच गिरीश वाघमारे, इब्राहिम खान, महिला विभागाच्या माधुरी जलमूलवार, वंदना थोरात, सचिन नागणे,  राजेश माने सुनीता पोतदार, शब्बीर शेख आदी या वेळी उपस्थित होते.राज्यासह परराज्यातील कामगारांनीही आपल्या समस्या मेधा पाटकर यांच्यासमोर मांडल्या. त्यांनी त्याची नोंद करत त्यावर लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासित केले. रेशन दुकानास भेट देऊन त्यांच्याकडे आलेला साठा व वितरण याबाबत माहिती घेतली. तसेच रेशन दुकानदारांना काही सूचना केल्या. 

मेधा पाटकर म्हणाल्या, कामगारांना त्यांच्या हक्काचे रेशन मिळाले पाहिजे. सध्याच्या स्थितीमध्ये रेशनिंगच्या बाबतीतल्या अडचणी दूर करून तीन महिन्यापर्यंत मोफत रेशन देण्याची सुविधा करणे गरजेचे आहे. विविध राज्यातील कामगारांना गावी जाण्यासाठी पोलिसांनी सहकार्य करावे, त्याचबरोबर राज्य परिवहन महामंडळ , रेल्वे प्रशासन यांनी ही टाळाटाळ न करता  त्यांना सहकार्य करावे आणि त्यांना इच्छित स्थळी जाण्याची सोय करून द्यावी. अनेक ठिकाणी कामगारांची आपल्या गावी जाण्यासाठी गर्दी होत आहे, परंतु त्यांना सुविधा मिळत नाहीत. विविध ठिकाणच्या कामगारांना लॉकडाऊनच्या पूवीर्पासूनचे आणि लॉकडाऊन काळातील त्यांचे वेतन मिळणे बाकी आहे. त्यांना सामाजिक जबाबदारी म्हणून वेतन मिळाले नाही. याची जबाबदारी मालक व व्यवस्थापनाने घ्यावी. कम्युनिटी किचन प्रशासनाकडून बंद केल्यामुळे अनेक लोकांचे हाल होत अहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. महिनाभर त्यांना जेवणाची सुविधा चालू ठेवावी.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMigrationस्थलांतरणLabourकामगारGovernmentसरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या