यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवसांची संपूर्णपणे संचारबंदी, फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 06:46 PM2021-02-26T18:46:31+5:302021-02-26T18:46:42+5:30

यवतमाळ : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांनी सदर ठिकाणी प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत निर्देशित केले आहे.

A complete curfew in Yavatmal district from Saturday evening to Monday morning | यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवसांची संपूर्णपणे संचारबंदी, फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार

यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवसांची संपूर्णपणे संचारबंदी, फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार

Next

यवतमाळ : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांनी सदर ठिकाणी प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत निर्देशित केले आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या शहरी व ग्रामीण क्षेत्रातील प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभाविपणे अंमलबजावणी करण्याकरीता नियम लागू करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी शनिवार सायंकाळी 5 वाजेपासून सोमवारी सकाळी 9 वाजेपर्यंत जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी घोषित केली आहे. 

या अंतर्गत दुध व दुग्धजन्य पदार्थ हे जिवनाश्यक / अत्यावश्यक असल्यामुळे तसेच ते नाशवंत पदार्थ असल्याने (दुध विक्रेते / डेअरी) आठवड्याचे सातही दिवस सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. तसेच शनिवार सायंकाळी 5 वाजेपासून ते सोमवार सकाळी 9 वाजेपर्यंत जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी घोषित करण्यात आली  आहे. सदर संचारबंदीच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील सर्व दवाखाने, औषधी दुकाने (जनावरांचे दवाखाने व त्यांच्या औषधी दुकानासह), पेट्रोलपंप, गॅस वितरण इत्यादी अत्यावश्यक सेवा सुरु राहतील ह्याची नोंद घ्यावी. 

जे वरील आदेशांचे उल्लंघन करतील त्यांचेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 व इतर संबंधीत कायदे व नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी कळविले आहे.

Web Title: A complete curfew in Yavatmal district from Saturday evening to Monday morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.