अंनिसची बदनामी करणा-यांचा लागला छडा, सायबर सेलकडे तक्रार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2017 16:02 IST2017-09-12T16:02:22+5:302017-09-12T16:02:22+5:30
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी दान केलेल्या गणपतीच्या मूर्ती विकल्या असल्याचे खोटे मेसेज व्हॉटस्अप, फेसबुकवरून व्हायरल करण्यात आले होते. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणी सायबर सेलकडे तक्रार नोंदविली आहे. त्याचबरोबर या मेसेजचा माग काढत हे खोटे मेसेज पाठविणा-यांचा छडा लावण्यात यश आले आहे.

अंनिसची बदनामी करणा-यांचा लागला छडा, सायबर सेलकडे तक्रार दाखल
पुणे, दि. 12 - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी दान केलेल्या गणपतीच्या मूर्ती विकल्या असल्याचे खोटे मेसेज व्हॉटस्अप, फेसबुकवरून व्हायरल करण्यात आले होते. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणी सायबर सेलकडे तक्रार नोंदविली आहे. त्याचबरोबर या मेसेजचा माग काढत हे खोटे मेसेज पाठविणा-यांचा छडा लावण्यात यश आले आहे.
नाशिकमधील एका संघटनेशी संबंधित असलेल्यांकडून करण्यात आला आहे, लवकरच संबंधितांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली आहे. अंनिसचे राज्याचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, शहर कार्याध्यक्ष श्रीपाल ललवाणी यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली.
अंनिसच्या वतीने गेल्या 20 वर्षांपासून पर्यावरण पूरक गणेशोत्सव हा उपक्रम राबविला जात आहे. कोल्हापुरातून सुरू झालेला हा उपक्रम आज राज्यभर जनचळवळ बनली आहे. पुण्यातील मानाच्या 5 गणेशोत्सव मंडळांनीही गणेश मूर्तींचे नदीत विसर्जन न करता कृत्रिम हौदात विसर्जन करण्याचा अभिनव पायंडा पाडला. यापार्श्वभूमीवर अंनिसची बदनामी करणारे मेसेज गणेश विसर्जनानंतर व्हायरल करण्यात आले होते. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधितांविरुद्ध सायबर सेलकडे तक्रार दाखल केलीच. त्याचबरोबर स्वत: त्या मेसेजचा माग घेत शोधून काढले आहे.
मिलिंद देशमुख यांनी सांगितले, गणेश विसर्जनामध्ये दान केलेल्या मूर्ती विक्री करताना अंनिसच्या कार्यकर्त्यांना पकडण्यात आले. त्यांना नागरिकांनी चोप दिला. तसेच त्यांच्याविरुद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारचे खोटे मेसेज व्हॉट्सअॅपवरून व्हायरल करण्यात आले होते. मुंढवा पोलीस ठाण्यामध्ये अशा प्रकारचा कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तसेच संबंधित पोलीस अधिका-याचे दिलेले नावही खोटे आहे. नागरिकांनी या खोटया पोस्टवर विश्वास ठेऊ नये, तसेच अफवांना बळी पडू नये. ही फेक न्यूज प्रसारीत करणा-यांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
शासनाचे पाऊल योग्य
पर्यावरणपूरक गणेशोत्सवामध्ये सहभागी न होण्याविषयी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील महाविद्यालयांना देण्यात आलेले परिपत्रक हे शासनाच्याच धोरणाच्या विरोधात होते. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधित परिपत्रक रदद् केले. तसेच ते काढणा-या अधिका-याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. शासनाकडून उचलण्यात आलेले पाऊल अत्यंत योग्य आहे.