शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR vs SRH Final : आंद्रे रसेलने २ विकेट्स घेऊन केला डान्स, Kavya Maran च्या संघाने गमावला जेतेपदाचा चान्स
2
मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार; २४ तासांसाठी हवामान अंदाज
3
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
4
डबलिनला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
5
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
6
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
7
"बलात्कार, जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत", स्वाती मालीवाल यांचा AAP वर गंभीर आरोप
8
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
9
मोठी बातमी : यजमान वेस्ट इंडिजने अखेरच्या क्षणाला संघ बदलला, अनुभवी खेळाडूची स्पर्धेतून माघार   
10
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
11
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
12
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

आदिवासींच्या लोकशिक्षणासाठी ‘कम्युनिटी रेडिओ’!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2017 8:34 AM

लुपिन ह्युमन वेलफेअर अ‍ॅण्ड रिसर्च फाऊंडेशनतर्फे साक्री तालुक्यातील जेबापूर या गावात रेडिओ पांझरा (एफएम ९०़४ मेगा हर्ट्झ) हे खान्देशातील पहिले कम्युनिटी रेडिओ केंद्र उभारण्यात आले आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील ६४५ गावांमध्ये या संस्थेने ग्रामीण विकास व उपजिविका सुधार अंतर्गत भारत परिवर्तन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कृषी, पशुधन विकास, कौशल्य विकास, जलसंधारण, महिला सक्षमीकरण, आरोग्य आणि शिक्षण याकरिता हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

धुळे,दि.४ - लुपिन ह्युमन वेलफेअर अ‍ॅण्ड रिसर्च फाऊंडेशनतर्फे साक्री तालुक्यातील जेबापूर या गावात रेडिओ पांझरा (एफएम ९०़४ मेगा हर्ट्झ) हे खान्देशातील पहिले कम्युनिटी रेडिओ केंद्र उभारण्यात आले आहे. या रेडिओ केंद्राचे उद्घाटन नुकतेच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याहस्ते झाले असून या केंद्रातून १५ आॅगस्टपासून प्रक्षेपण सुरू होणार आहे.

धुळे जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा विकास करण्यासाठी देशबंधू व मंजू गुप्ता फाऊंडेशन व लुपिन ह्युमन वेलफेअर अ‍ॅण्ड रिसर्च फाऊंडेशन २०१० पासून कार्यरत आहे. जिल्ह्यातील ६४५ गावांमध्ये या संस्थेने ग्रामीण विकास व उपजिविका सुधार अंतर्गत भारत परिवर्तन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कृषी, पशुधन विकास, कौशल्य विकास, जलसंधारण, महिला सक्षमीकरण, आरोग्य आणि शिक्षण याकरिता हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

अहिराणीसह स्थानिक भाषेत कार्यक्रमपिंपळनेरनजीक असलेल्या जेबापूर या गावात केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या मान्यतेने रेडिओ पांझरा हे रेडिओ केंद्र कार्यान्वित केले आहे़ अहिराणी, मावची, भिल्ल, कोकणी या स्थानिक भाषेतील कार्यक्रम हे या केंद्राचे वैशिष्ट्य आहे़

जाणीव जागृतीसह लोकशिक्षणाचा हेतूकृषी पशुधन विकास, आरोग्य, कौशल्य विकास, शिक्षण, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, शासनाच्या विविध योजना, महिला सबलीकरण, जलसंधारण या विषयांवर जाणीव जागृती व लोकशिक्षण हा रेडिओ केंद्राचा मुख्य हेतू आहे़ यासोबतच यामाध्यमातून आदिवासी बहुल भागातील लोककला, लोकगीत, लोकसंस्कृतीला व्यासपीठ उपलब्ध करण्याचा प्रयत्न राहणार आहे.

रेडिओ केंद्राच्या परिघात ८४ गावांचा समावेशपिंपळनेर परिसरात असलेल्या डोंगराळ भागातील ८४ आदिवासी गावे या रेडिओ केंद्राच्या परिघात येतील़ संबंधित गावांना सद्यस्थितीत कोणत्याही रेडिओ चॅनलची सेवा मिळत नाही़ त्यामुळे त्यांना आपुलकी वाटेल असे चॅनेल सुरू करण्यात आले आहे़ हे रेडिओ केंद्र सुरू करण्यापूर्वी त्याची जनजागृती संंबंधित गावांमध्ये केली जाणार आहे़ या रेडिओ केंद्रासाठी देशबंधू मंजु गुप्ता व लुपिन फाऊंडेशनचे विशेष प्रयत्न सुरू आहेत़प्रसारित होणारे कार्यक्रमसंतवाणी, कृषीसंदेश, आरोग्यमंत्र, युवाशक्ती, मनोरंजन, आदिवासी संस्कृती व लोककला, ग्रामोदय, स्वामिनी या प्रमुख कार्यक्रमांसह समाजातील ज्वलंत विषय, शिक्षण, पर्यावरण संरक्षण, स्त्री शिक्षण याविषयी चर्चा, मुलाखत, भाषण व तज्ज्ञांच्या व सामान्य जनतेच्या स्वरात कार्यक्रम प्रसारण होणार आहे़ १५ आॅगस्टपासून दररोज सकाळी ७ तेर् १० व सायंकाळी ४ ते ७ रेडिओ प्रक्षेपण होणार आहे़

बंगळूरच्या संस्थेचे सहकार्यसदर रेडिओ केंद्र सुरू करण्यासाठी बंगळूरच्या एका संस्थेने तांत्रिक सहकार्य केले आहे. तर पुणे येथील युनिक फिचर्स ही संस्था प्रक्षेपित होणाºया कार्यक्रमांसाठी सहकार्य करणार आहे़ रेडिओ केंद्रासाठी ३० मीटर उंच टॉवर उभारण्यात आला आहे़ दासु वैद्य यांनी या रेडिओ केंद्राचे थीमसाँग लिहिले आहे़ सुरूवातीला दिवसात ६ तास होणारे प्रक्षेपण हळूहळू वाढविले जाणार आहे़