शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

गंमत निवडणूक चिन्हांची!

By admin | Updated: October 10, 2014 05:16 IST

आपापले निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी प्रत्येकच पक्षाचे प्रयत्न सुरू असतात. परंतु, प्रस्थापित पक्ष वगळता,

मुंबई : आपापले निवडणूक चिन्ह मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी प्रत्येकच पक्षाचे प्रयत्न सुरू असतात. परंतु, प्रस्थापित पक्ष वगळता, अन्य लहान-सहान पक्ष किंवा अपक्ष उमेदवारांची निवडणूक चिन्ह मतदारांच्या किती लक्षात राहतात, हा प्रश्नच आहे. काही हटके चिन्ह मात्र उमेदवाराच्या प्रयत्नांविनाच विशेष चर्चेत राहतात. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मॉडेल राखी सावंत हिचे हिरवी मिर्ची हे निवडणूक चिन्हही असेच चर्चेत होते.निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली, मात्र अद्याप कोणत्याही पक्षाला देण्यात न आलेली अशी ‘मुक्त निवडणूक चिन्ह’ अपक्ष किंवा मान्यता प्राप्त न झालेल्या पक्षांना वापरता येतात. यातीलच एखादे चिन्ह घेऊन पक्षाने निवडणुकीत किमान आठ टक्के मते मिळविल्यास ते चिन्ह पक्षाला अधिकृत चिन्ह म्हणून बहाल करण्यात येते. झाडू, रेल्वे इंजिन हीसुद्धा आधी मुक्त चिन्हे होती. मात्र आता ती विशिष्ट पक्षांची ओळख झाले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात येणारी काही निवडणूक चिन्ह इतकी वैशिष्टपूर्ण आणि हटके असतात की, ती चिन्हे वापरणाऱ्यांची मतदारांमध्ये उपरोध किंवा गमतीनेच चर्चा होत राहते. आयोगाने जानेवारी २०१३ मध्येही प्रसिद्ध केलेल्या मुक्त निवडणूक चिन्हांच्या नव्या यादीमध्येही अशी अनेक हटके चिन्ह आहेत. त्यात ब्रेड- केक- आइस्क्रीमपासून ते द्राक्ष- गाजरापर्यंत खाद्यपदार्थ; फुगा- बॅटपासून ते कॅरमपर्यंत खेळणी; एसी- कॅमेरापासून ते फ्रिझ- मिक्सरपर्यंत इलेक्ट्रॉनिकल वस्तू; कातर- करवत- दप्तर- फळा- अंगठी, अशा अनेक हटके निवडणूक चिन्हांना आयोगाने मान्यता दिलेली आहे.