शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

बिग बॉसमध्ये मराठीचा अपमान; कलर्सनं मागितली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माफी

By कुणाल गवाणकर | Updated: October 28, 2020 15:25 IST

जान कुमार सानूच्या विधानाविरोधात शिवसेना, मनसेनं घेतली होती आक्रमक भूमिका

मुंबई: बिग बॉस कार्यक्रमात मराठीचा अपमान करणाऱ्या गायक जान कुमार सानूविरोधात मनसे, शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. यानंतर बिग बॉस कार्यक्रम प्रसारित करणाऱ्या 'कलर्स' वाहिनीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून माफी मागितली आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्यानं आम्ही माफी मागतो, असं कलर्सनं मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. तुला लवकरच थोबडवणार; मनसेची जान कुमार सानूला थेट धमकीबिग बॉसच्या १४ व्या हंगामात निक्की तांबोळी आणि जान कुमार सानू यांच्यात वाद झाला. त्यावेळी निक्की तांबोळी मराठीत बोलत होती. त्यावरून जाननं राग व्यक्त केला. मला मराठी भाषेची चीड येते, असं जाननं म्हटलं. यावरून मनसेनं आक्रमक भूमिका घेत जानला थेट इशारा दिला आहे. तर शिवसेनेनं जानची हकालपट्टी करण्याची मागणी केली. यानंतर कलर्सनं मुख्यमंत्र्यानी पत्र लिहून माफी मागितली.

'२७ ऑक्टोबरला प्रसारित झालेल्या बिग बॉसच्या एपिसोडसंदर्भात काही आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. त्याची दखल घेऊन संबंधित भाग सर्व एपिसोड्समधून काढून घेण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. मराठी भाषेसंदर्भातल्या विधानामुळे महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना दुखावल्या असल्यास आम्ही माफी मागतो. आम्ही मराठी प्रेक्षकांचा आदर करतो. भारतातल्या सगळ्याच भाषणांचा आम्ही सन्मान करतो,' असं कलर्सनं मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

मनसेची आक्रमक भूमिका; जान कुमार सानूला थेट इशारा'जान कुमार सानू... मराठी भाषेची याला चीड येते म्हणे. अरे तू कीड आहेस मोठी... मुंबईतून हाकलून देण्यासाठी मी नॉमिनेट करतोय याला,' अशा शब्दांत मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी संताप व्यक्त केला आहे. 'मुंबईत राहून तर आता तुझं करिअर कसं बनतं जान सानू तेच बघतो आता मी. लवकरच तुला स्वत:ची चीड येईल ही माझी गॅरंटी. तुला थोबडवणार लवकरच आता आम्ही मराठी,' असा थेट इशारा खोपकर यांनी दिला आहे. 'कलर्ससारख्या वाहिनीने खरंतर हा सीन वगळायला हवा होता, पण एडिट केलं नाही ते बरं झालं, गद्दारांची तोंडं कशी असतात ते समजलं,' असं खोपकर यांनी ट्विटमध्ये पुढे म्हटलं आहे. 

कोण आहे जान कुमार सानू?जान कुमार सानूचं मूळ नाव जयेश भट्टाचार्य आहे. तो प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा आहे. संगीत क्षेत्रात वडिलांच्या पावलावर पाऊल टाकायचं असल्यानं मी माझ्या नावापुढे त्याचं नाव लावतो, असं जाननं टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेbigg boss 14बिग बॉस १४MNSमनसेShiv Senaशिवसेना